Prakash Raj Saam TV
मनोरंजन बातम्या

Prakash Raj Birthday:'हा' खलनायक आहे लक्झरी कारचा शौकीन; कलेक्शनमध्ये आहेत करोडोंच्या गाड्या

Prakash Raj Car Collection: प्रकाश राज यांना लक्झरी गाड्यांचा शौक आहे.

Pooja Dange

Prakash Raj Birthday Special: साऊथ स्टार आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्हिलन म्हणून दिसलेले अभिनेते यांचा आज म्हणजे २६ मार्चला वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव प्रकाश राय आहे. 1994 मध्ये त्यांनी 'दुते' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात केले. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी प्रकाश नाटकांमध्ये काम करायचे.

प्रकाश राज यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. नकारात्मक पात्र साकारणाऱ्या प्रकाश राज यांची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. खलनायक म्हणून ते चाहत्यांना खूप आवडते.

प्रकाश राज अनेक बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. 'वॉन्टेड', 'दबंग 2', 'सिंघम' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासह प्रकाश राज राजकारणात देखील सक्रिय आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कर्नाटकातील बंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, प्रकाश राज यांना लक्झरी गाड्यांचा शौक आहे. प्रकाश राज यांच्याकडे महागड्या गाड्यांचे भन्नाट कलेक्शन आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा कार आहे, ज्याची किंमत १७ लाखांहून अधिक आहे.

याशिवाय, प्रकाश राजकडे BMW 520D आहे, ज्याची किंमत 45 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांच्या कलेक्शनमध्ये सर्वात महाग कार मर्सिडीज बेंझ आहे. या कारची किंमत सुमारे 63 लाख रुपये आहे. त्याच्याकडे ISUZU V, बोलेरो मॅक्सी ट्रक, ऑडी Q3 सारखी आलिशान गाड्या आहेत.

प्रकाश राज यांची दोन लग्ने झाली आहेत. त्यांची पहिली पत्नी साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ललिता कुमारी होती. 1994 मध्ये त्याने तिच्याशी लग्न केले. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले होती.

ललिता आणि प्रकाश यांचे लग्न काहीच वर्ष टिकले. त्यांचा मुलगा पाच वर्षांचा असताना त्याचे निधन झाले, त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला आणि 2009 मध्ये दोघेही वेगळे झाले.

2010 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर त्याची पोनी वर्माशी भेट झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न केले. प्रकाशने दुसऱ्या लग्नासाठी मुलींची परवानगी घेतली होती. दुसऱ्या पाटणकडून त्यांना एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव वेदांत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT