Prakash Raj's Tweet on Chandrayaan-3 Saam TV
मनोरंजन बातम्या

Prakash Raj's Tweet: 'चांद्रयान 3'च्या यशानंतर प्रकाश राज यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक, सोशल मीडियावर ट्रोलर्सनी तरीही झापलं

Prakash Raj Feel Proud: इस्रोचे अभिनंदन करत प्रकाश राज यांनी ही क्षण किती अभिमानास्पद आहे हे सांगितले आहे.

Pooja Dange

Prakash Raj's Tweet On Chandrayaan-3:

सोशल मीडियावर 'चांद्रयान ३'वर कमेंट केल्यामुळे ट्रोल झालेले प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बुधवारी प्रकाश राज यांनी 'चांद्रयान ३'ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर अभिनंदन करणारे ट्वीट केले. भारताने रचलेल्या या ऐतिहासिक क्षणाविषयी त्यांना खूप अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इस्रोचे अभिनंदन करत प्रकाश राज यांनी ही क्षण किती अभिमानास्पद आहे हे सांगितले आहे. प्रकाश राजने एक्स म्हणजे ट्विटर पोस्ट करत लिहिले आहे की, 'भारतासाठी आणि मानवजातीसाठी अभिमानाचा क्षण.. #ISRO #Chandrayaan3 #VikramLander आणि ज्यांनी हे घडवून आणण्यासाठी योगदान दिले त्या प्रत्येकाचे आभार.. हे आम्हाला आमच्या विश्वाविषयी माहीत नसलेले रहस्य शोधण्यात आणि ते साजरे करण्यासाठी मार्गदर्शन करू शकेल.. #justasking'

प्रकाश राज यांनी सोमवारी एक मीम शेअर केले होते..या मीममुळे प्रकाश राज यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर एका हिंदू संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना प्रकाश राज म्हणाले आहेत की, द्वेष करणाऱ्यांनाच द्वेष करणारे दिसतात. (Latest Entertainments News)

इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' या लँडरने सॉफ्ट-लँडिंग करून नवा इतिहास रचला. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला. यासह, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील पहिला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चार देशांपैकी एक बनला आहे.

का ट्रोल होत आहेत प्रकाश राज?

चांद्रयान-३ ने लँडिंग करण्यापूर्वी लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) वापरून ही फोटो काढले होते तेव्हा प्रकाश राज यांनी इस्रोच्या माजी प्रमुखांची खिल्ली उडवली आहे. हे फोटो चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावरील त्या ठिकाणची आहेत, जिथे चांद्रयान-3 चे लँडर विक्रम उतरणार आहे.

प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटरवर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ते शर्ट आणि लुंगी घालून चहा ओतताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले, 'ब्रेकिंग न्यूज! (Actor)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT