Prajakta Mali Visits Bhima shankar Jyotirling Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Birthday: वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने घेतले भीमा शंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, फोटो केले शेअर

Prajakta Mali Visits Bhima shankar Jyotirling: वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब दर्शन घेतले. १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत तिने सोशल मीडियावर मंदिरातील खास फोटो शेअर केले.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातली आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने भीमा शंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर याचदरम्यानचे फोटो देखील तिने शेअर केले आहेत. प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत भीमा शंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.

भीमा शंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फोटो शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये, 'भीमा शंकर ज्योतिर्लिंग- पुणे- महाराष्ट्र, आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या “भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे” सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पुर्ण केली.' असं म्हटलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा देवावर प्रचंड विश्वास आहे. नेहमीच प्राजक्ता माळी देव दर्शनला जात असते. प्राजक्ता माळीने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्यासोबत तिची आई आणि कुटुंबातील मंडळी दिसत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील कुटुंबासह प्राजक्ताने फोटो क्लिक केले आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

SCROLL FOR NEXT