Teen Adkun Sitaram  Instagram/ @prajakta_official
मनोरंजन बातम्या

New Marathi Movie: प्राजक्ता माळी झळकणार नव्या चित्रपटात, 'तीन अडकून सीताराम'ची घोषणा

Prajakta Mali Upcoming Movie: या चित्रपटाचे पोस्टर प्राजक्ता माळीने शेअर केले आहे.

Pooja Dange

Teen Adkun Sitaram Upcoming Marathi Movie:

मराठी सिनेसृष्टीत सध्या चित्रपटांची धुम आहे. अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करत आहेत.

अनेक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, त्यांत 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचा देखील समावेश आहे.

'तीन अडकून सीताराम' हे नाव जरा विचित्र वाटतंय ना? हे असं नाव कसं? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर हा एक कोल्हापुरातील वाक्यप्रचार आहे. जर या अर्थ जाणून घ्यायचा साले तर तुम्हाला चित्रपट पाहावा लागले.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर प्राजक्ता माळीने शेअर केले आहे. त्यामुळे प्राजकता देखील या चित्रपटामध्ये दिसणार का? ती कोणती भूमिका साकारणार असे अनेक प्रश्न सर्वांचा पडले आहेत.

नुकत्याच झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की !

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा, असा हा विनोदी चित्रपट आहे. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल. चित्रपटाचे निर्माते अतिशय ताकदीचे आहेत. त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

अशा निर्मात्यांसोबत काम करताना चांगली ऊर्जा मिळते. साहजिकच त्याने उत्कृष्ट कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर होते. एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीम भारी आहे. हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच.’’ (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT