Prajakta-Amruta SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta-Amruta : हर हर महादेव! प्राजक्ता माळी अन् अमृता खानविलकरनं घेतलं केदारनाथचं दर्शन, पाहा VIDEO

Prajakta Mali-Amruta Khanvilkar Kedarnath visit : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने 'श्री केदारनाथ' मंदिराचे दर्शन घेतले आहे. याचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या अभिनय आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. मात्र आता प्राजक्ता माळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ता माळीने 'श्री केदारनाथ' चे (Shri Kedarnath Jyotirlinga Temple) दर्शन घेतले आहे. याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

उत्तराखंडमधील श्री केदारनाथ मंदिर 12 ज्योतिर्लिंग यात्रेतील 11 वे ज्योतिर्लिंग आहे. या यात्रेत प्राजक्ता माळी एकटी नसून तिच्यासोबत तिचे कुटुंब आणि मराठमोळी अभिनेत्री जिने आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावले आहे अशी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) देखील होती. श्री केदारनाथ मंदिरच्या परिसरातील खूप छान फोटो तिने शेअर केले आहे. ज्यात कुटुंब आणि अमृता खानविलकर दिसत आहे. या फोटोंना प्राजक्ता माळीने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "श्री केदारनाथ...रुद्रप्रयाग- उत्तराखंड...अशाप्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडले. यावेळी कुटुंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे."

प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर केदारनाथला एका खास लूकमध्ये दिसले. दोघींनीही सुंदर साडी नेसली होती. प्राजक्ता माळीने मोती रंगाची साडी, मोकळे केस आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असा लूक केला होता. तर अमृताने पांढऱ्या रंगाची साडी, नाकात नथ, पारंपरिक दागिने आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून लूक पूर्ण केला होता. दोघीसुद्धा खूपच सुंदर दिसत होत्या.

अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील 'श्री केदारनाथ' दर्शनाचा खूप छान व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला तिने सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने या व्हिडीओमधून 'श्री केदारनाथ' दर्शनाची एक छोटी झलक दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचे कोड नेम काय होते? प्रत्येक भारतीयाला या १० गोष्टी माहित असायला हव्यात

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT