Salaar Poster Out Instagram
मनोरंजन बातम्या

Salaar Poster: प्रभासचा ‘सालार’मधला ॲक्शन लूक पाहिलात का?, दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केली ट्रेलर रिलीज डेट

Salaar Trailer Release Date: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सालार’चा नवा पोस्टर रिलीज झाला असून निर्मात्यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

Chetan Bodke

Salaar Poster Out

प्रभासचा येत्या २२ डिसेंबरला बहुप्रतिक्षित ‘सालार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’नंतर प्रभासचा हा मोस्ट अवेटेड सिनेमा असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. पोस्टरमध्ये निर्मात्यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रभासने ‘आदिपुरुष’मध्ये प्रभु श्रीरामाचे पात्र साकारले होते. त्याचा हा बिगबजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आता चाहत्यांना ‘सालार’ मधून खूपच अपेक्षा आहेत. नुकतीच सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्यापासून प्रेक्षक सिनेमाची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीनिमित्त अभिनेत्याने फॅन्सला चांगलंच गिफ्ट दिले आहे. येत्या १ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी सालारचा ट्रेलर रिलीज होणार आहे. त्यामुळे आता प्रभासच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

केजीएफच्या दिग्दर्शकांनी प्रभासच्या ‘सालार’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रभास बरोबर सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. प्रभासच्या ‘सालार’सोबत थिएटरमध्ये शाहरुख खानचा ‘डंकी’ सुद्धा रिलीज होणार आहे. दोघांमध्येही काटे की टक्कर होणार असल्यामुळे ह्या दोन्हीही चित्रपटामध्ये सर्वाधिक कमाई कोण करणार याची आत्तापासूनच जोरदार चर्चा होत आहे.

प्रभासचा ‘सालार’ अगदी सेम टू सेम हॉलिवूड चित्रपटाप्रमाणेच असणार अशी सध्या जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपट अगदीच हॉलिवूडपटासोबत बरोबर करणारे आहेत. प्रशांत नील यांनी हा सिनेमा इंटरनॅशनल लेव्हल स्टाईलमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सालारच्या मेकर्सने चित्रपट प्रेक्षकांना कसा भावेल?, याकडे पुरेपुर लक्ष दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT