Prabhas Project K First Look Out Instagram @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Prabhas Look In Project K : प्रभास झाला मार्व्हल सुपरहिरो; 'प्रोजेक्ट के'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट

Prabhas Project K Look : प्रोजेक्ट के या चित्रपटाची निर्मिती संस्था वैजयंती फिल्म्सने प्रभासचे फर्स्ट लूक प्रदर्शित केले आहे.

Pooja Dange

Prabhas Project K First Look Out : प्रोजेक्ट के या चित्रपटाची निर्मिती संस्था वैजयंती फिल्म्सने प्रभासचे फर्स्ट लूक प्रदर्शित केले आहे. या साय-फाय चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.

प्रभासचा फर्स्ट लुक

वैजयंती मूव्हीजच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेला प्रभासचा फर्स्ट लूक, तो एका रफ अँड टफ अवतारात दिसत आहे. प्रभास एका सुपरहिरो आर्मरमध्ये दिसत आहे, त्याने जमिनीवर पंच केला असून तो तीक्ष्ण कटाक्ष देताना दिसत आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये त्याचे लांब केस आणि दाढी त्याच्या लूक अधिक एनहान्स करत आहेत. (Latest Entertainment News)

प्रभासचा फर्स्ट लूकसह पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हीरो येत आहे. आता गेम बदलणार (फायर इमोटिकॉन). प्रोजेक्ट K मधील हा विद्रोही स्टार प्रभास आहे. फर्स्ट लूक.

सॅन डिएगो कॉमिक-कॉन (SDCC) 2023 मध्ये पदार्पण करणारा प्रोजेक्ट के हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे. न्यूयॉर्क शहरात टाइम्स स्क्वेअरवर "20 जुलै रोजी पहिली झलक" असे लिहिलेला प्रोजेक्ट केचा एक बिलबोर्ड दिसला. सोमवारी या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

हॉलिवूडमध्ये प्रभास आणि राणा

मंगळवारी, प्रभास आणि राणा दग्गुबती दोघेही सॅन डिएगो कॉमिक-कॉन (SDCC) 2023 च्या आधी यूएसमध्ये दाखल झाले. वैजयंती मूव्हीज या प्रोडक्शन हाऊसने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये बाहुबलीमध्ये काम केलेले दोन्ही कलाकार दिसत आहेत. दोघांनी 'व्हॉट इज प्रोजेक्ट के' टी-शर्ट घातलेले आहेत.

सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेंटबद्दल

या कार्यक्रमात नाग अश्विनसोबत कमल हसन, प्रभास आणि दीपिका पदुकोण सहभागी होणार आहेत. प्रोजेक्ट केची टीम कॉमिक-कॉन येथे चित्रपटाचे शीर्षक, ट्रेलर आणि रिलीजची तारीखचे अनावरण करेल. प्रोजेक्ट के हा वैजयंती मूव्हीज निर्मित बहुभाषिक साय-फाय चित्रपट आहे. SDCC 20-23 जुलै दरम्यान होणार आहे.

वैजयंती मूव्हीज 19 जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीचा एक भाग म्हणून चाहत्यांना चित्रपट पाहण्याची ऑफर देईल. 20 जुलै रोजी, चित्रपटाची टीम "दिस इज प्रोजेक्ट के: इंडियाज मिथो-साय-फाय एपिकची पहिली झलक" शीर्षक असलेल्या पॅनेलचे आयोजन करेल.

या कार्यक्रमाविषयी बोलताना नाग अश्विनने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारत हे आतापर्यंत लिहिलेल्या काही महान दंतकथा आणि सुपरहिरोचे जन्मस्थान आहे. आम्हाला वाटते की आमचा चित्रपट हा जगासमोर आणण्याचा आणि शेअर करण्याचा प्रयत्न आहे. कॉमिक-कॉन आमच्या कथेची जागतिक प्रेक्षकांना ओळख करून देण्यासाठी आम्हाला परिपूर्ण स्थान देते.”

प्रोजेक्ट के 12 जानेवारी 2024 रोजी तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Updates: नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

Shiv Temple: गुफेत आहे शिव मंदिर, महाराष्ट्रातील केदारनाथ तुम्ही पाहिलंय का?

IPL 2025 Mega Auction: धोनीचा खास भिडू मुंबईच्या ताफ्यात! या ३ गोलंदाजांवर लागली मोठी बोली

IPL Mega Auction 2025 Live News: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या अंशुल कंबोजवर ३.४० कोटींची बोली

SCROLL FOR NEXT