Bharat Jadhav Announce New Marathi Natak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bharat Jadhav Announce New Marathi Natak: भरत जाधवचं नवीन नाटक; रंगभूमीवर सादर करणार आजवर कधीही न पाहिलेली भूमिका

Bharat Jadhav New Marathi Natak: भरत जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विशेष पोस्ट शेअर करत त्याने नाटकाबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Chetan Bodke

Bharat Jadhav Announce New Marathi Natak: भरत जाधव मराठी सिनेसृष्टीतलं सर्वाधिक गाजलेलं नाव. भरतने प्रेक्षकांचे आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून भरत जाधवने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

कायमच चित्रपटातून पाहिलेल्या भरत जाधवला लवकरच प्रेक्षक एका नाटकाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. नुकतंच भरत जाधवने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विशेष पोस्ट शेअर करत त्याने नाटकाबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

कायमच सिनेसृष्टीत आदराने नाव घेणाऱ्या कलाकारांमध्ये भरत जाधवचे नाव अग्रस्थानी आहे. ‘सही रे सही’ या नाटकाच्या माध्यमातून भरतला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या नाटकाला नुकतंच २१ वर्ष पूर्ण झाली असून नाटकाला प्रेक्षकांकडून कायमच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भरत ‘तू तू मी मी’, ‘मोरूची मावशी’, ‘सही रे सही’ या नाटकाच्या शोमध्ये बराच व्यग्र आहे.

नुकताच भरत जाधवने सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून नव्या नाटकाची घोषणा केली आहे. “‘लवकरच’ असं कॅप्शन लिहित त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. भरत जाधवने त्या शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलंय की, “रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादानं ‘सही रे सही’ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या ‘भरत’नं मागील ३० वर्षं आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे… पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळवं करायला… नवं नाटक घेऊन… कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत… भरत जाधव एंटरटेन्मेंट सादर करीत आहे ‘अस्तित्व’.” अशी व्हिडीओ त्याने शेअर केली आहे. भरत जाधवच्या नव्या नाटकाचं स्वप्नील जाधव यांनी लेखक आणि दिग्दर्शन केलं असून भरत जाधव एंटरटेन्मेंटने नाटकाची निर्मिती केली.

भरतने शेअर केलेल्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एक युजर म्हणतो, ‘दादा तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!’ तर तर आणखी एक म्हणतो, ‘अभिनंदन आणि हाऊसफुल्ल शुभेच्छा भरत!’ तर आणखी एक चाहता म्हणतो, ‘वाट बघत आहोत भरत सर. पण, शिवाजी मंदिर दादरमध्ये पहिला प्रयोग करा.’ तर आणखी एक चाहता म्हणतो, ‘नवीन चित्रपट येऊ द्या दादा.’

या नाटकामध्ये भरत जाधव कोणत्या भूमिकेत दिसणार हे लवकरच येत्या काही दिवसात कळणार आहे. भरत जाधवने अनेक नाटकात मुख्य भूमिका साकारल्या असून चित्रपटातही त्याने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नागपूर हादरलं! तीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही, नाल्यात सापडला मृतदेह

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंना रुग्णालयात केलं दाखल

Rice Cooking Tips : भात खूपच चिकट होतो? एकदा ट्राय करा 'ही' ट्रिक, तांदळाचा प्रत्येक दाणा दिसेल वेगळा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कॉफीचा वापर केला जायचा का?

Homemade Hair Gel : महागडे पार्लर विसरा; 'या' बियांपासून बनवा हेअर जेल, केस होतील मजबूत अन् चमकदार

SCROLL FOR NEXT