Akshay Kumar News: भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर २०२४ ची निवडणूक अक्षय कुमार लढवणार का? नेमकी का सुरू आहे चर्चा?

Akshay Kumar News: भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
Akshay Kumar News
Akshay Kumar NewsSaam tv
Published On

Akshay Kumar News: अभिनेता अक्षय कुमारला भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून अक्षयने ट्विट करत माहिती दिली आहे. भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्याान, अक्षय कुमारने या आधीच राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. (Latest Marathi News)

अक्षयला प्रसार माध्यमांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अक्षय कुमार म्हणाला होता, 'मी राजकारणात येण्यास इच्छुक नाही. मला चित्रपट करायचे आहेत. देशातील नागरिक राष्ट्रासाठी काम करतात, त्याचप्रकारे मी काम करत आहे. मला राजकारणात जायचं नाही. मी चित्रपटात काम करूनच खूप खूश आहे'.

Akshay Kumar News
Indradhanush Movie: सुकन्या मोने ‘बाईपण भारी देवा’नंतर आणखी एका मराठी चित्रपटामध्ये झळकणार, परदेशात केला शुटिंगचा श्रीगणेशा

दरम्यान, अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे जाहीर केले आहे. अक्षयने इन्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. अक्षयने गृहमंत्रालयाचे एक लेटर शेअर केले. यावेळी अक्षय पोस्ट करत म्हणाला की, 'दिल ओर सिटिज़नशिप, दोनों हिंदुस्तानी. स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!'.

त्याच्या पोस्टवर चाहते कमेंट करत अभिनंदन करत आहेत. तसेच अक्षयला काही जण ट्रोल देखील करत आहेत.

अक्षयला कॅनडाचं नागरिकत्व कधी मिळालं होतं?

अक्षय म्हणाला होता की, १९९०-२००० दशकात अक्षयचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. त्यामुळे त्याने कॅनडामध्ये काम सुरू केलं होतं. तेव्हा त्याने कॅनडाचं नागरिकत्व घेतलं होतं. अक्षयचे चित्रपट भारतात गाजू लागले, त्यानंतर अक्षय पुन्हा भारतात परतला'.

Akshay Kumar News
Akshay Kumar Share Post: कॅनडियन नागरिकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांसाठी अक्षय कुमारची स्वातंत्र्यदिनी खास पोस्ट

तत्पर्वी, अक्षय कुमार ' ओएमजी २' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर अक्षय 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याच्यासोबत टायगर श्रॉफ देखील दिसणार आहे. त्याचं गाणंही प्रकाशित झालं आहे. त्याच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com