मल्याळम सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. मल्याळम सिने- अभिनेता विनोद थॉमस यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले आहे. केरळ राज्यातील पंपाडीजवळील एका हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये अभिनेता मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तपास करीत आहेत. पोलिस तपासामध्ये, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण केरळा पोलिस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Tollywood)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांसह, मित्र- परिवाराला आणि त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे. शनिवारी अर्थात १८ नोव्हेंबरला हॉटेल व्यवस्थापनाने पोलिस सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल परिसरामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये विनोद थॉमस बराच वेळ बसलेले होते. याबद्दलची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी लगेचच विनोद यांना जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तोपर्यंत अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. (Actor)
तपासादरम्यान डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केले. दरम्यान, अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून अभिनेत्याच्या मृत्यूचे गुढ शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. (Entertainment News)
विनोद थॉमसबद्दल सांगायचे तर, ते मल्याळम सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेते होते. 'अय्यप्पनम कोस्युम', 'नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला', 'ओरू मुराई वंथ पथया', 'हॅपी वेडिंग' आणि 'जून' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. कायमच विनोद आपल्या खास शैलीतील अभिनयासाठी ओळखले जायचे. (Latest News)
दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांकडून विनोद थॉमस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. चाहत्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना खंबीर राहण्यास सांगितले. (Social Media)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.