Late Indonesian social media influencer and singer Lula Lahfah, who passed away at the age of 26. Saam Tv
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे अवघ्या 26 व्या वर्षी निधन, फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

Indonesian Social Media Influencer Lula Lahfah Death News: प्रसिद्ध इंडोनेशियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि गायिका लूला लहफाचे अवघ्या 26 व्या वर्षी निधन. जकार्तामधील अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

इंडोनेशियाची लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकार स्टार लूला लहफाचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच, आता तिच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, 23 जानेवारी रोजी इंडोनेशियातील दक्षिण जकार्ता येथील धर्मवांग्सा कॉम्प्लेक्समधील तिच्या फ्लॅटमध्ये लूलाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोसायटीतील सुरक्षारक्षकांना लूला लहफाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी लूलाच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. लूला लहफाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू

मृत्यूच्या कारणाचा सखोल तपास करण्यासाठी तिचा मृतदेह जकार्तामधील फातमावती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

लूला सोशल मीडियावर ३.३ मिलीयन फॉलोअर्स

लूला लहफा ही सोशल मीडियावरील एक अतिशय लोकप्रिय इन्फ्लुएंसर होती. तिच्या उत्कृष्ट कंटेंट व्यतिरिक्त, ती तिच्या गायनासाठी देखील ओळखली जात होती. इंस्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स लक्षणीय आहेत, तिचे अंदाजे ३.३ मिलीयन फॉलोअर्स आहेत. लूला लहफा तिच्या गोड आवाजाइतकीच सुंदर होती. लूला लहफाने प्रथम साउंडक्लाउडवर गाणी गायली आणि त्यांच्या गाण्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने स्वतःचा अल्बम रिलीज केला, ज्याला प्रचंड प्रेम मिळाले. १९९९ मध्ये जन्मलेल्या लूला लहफा यांनी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. माहितीनुसार तिला आरोग्याच्या समस्या देखील होत्या, ज्यामुळे तिला अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील बिहार भवनवरुन वादाचा भडका, बिहार भवनचं बांधकाम थांबवून दाखवा

मेलो तरी 2 व्यापा-यांचा गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी, शाहांवर हल्लाबोल

मराठमोळ्या डोंबिवलीत मराठी माणूस उपेक्षित, केडीएमसीकडून भैय्यांचे लाड, मराठींचा द्वेष

Sunday Horoscope : कामातले अडथळे होणार दुर, महत्वाची कामं होणार पूर्ण, ४ राशींची चांदी; वाचा रविवारचे राशीभविष्य

'अख्ख्या महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू'; गळ्यात भगवं उपरण घालून इम्तियाज जलील यांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT