Suspicious death of Connor Murphy under investigation saam tv
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध फिटनेस युट्युबरचा थायलंडमध्ये संशयास्पद मृत्यू, तलावात सापडला मृतदेह

American Bodybuilding Influencer Died: अमेरिकेतील लोकप्रिय फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबरचा वयाच्या ३२ व्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झालाय. त्याचा मृतदेह एका तलावात आढळून आला असून या घटनेमुळे जगभरातील त्याचे लाखो चाहते हादरून गेले आहेत.

Bharat Jadhav

  • प्रसिद्ध अमेरिकन फिटनेस युट्युबर कॉनर मर्फी यांचा थायलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला.

  • समूत प्रकान प्रांतातील एका तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला

  • कॉनर मर्फी हे बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती होते.

सोशल मीडियावरील बॉडीबिल्डिंग विश्वातील एकेकाळचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध चेहरा असलेला अमेरिकन फिटनेस इन्फ्लुएन्सरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कॉनर मर्फी असं युट्युबरचा नाव आहे. थायलंडमध्ये वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. थायलंडच्या समूत प्रकान प्रांतातील एका तलावात पोलिसांना कॉनर मायकेल मर्फीचा मृतदेह सापडला. या वृत्तामुळे जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बँकॉकजवळील एका भाड्याने घेतलेल्या आलिशान प्रॉपर्टीमध्ये घडली. कॉनर अचानक विचित्र वर्तन करू लागला. त्यानंतर घरातून बाहेर पडत तो तलावामध्ये शिरला. तो काही वेळ पोहताना दिसला आणि अचानक पाण्याच्या खाली गायब झाला. माहिती मिळताच रेस्क्यू डायव्हर्सनी शोधमोहीम राबवून त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरावर कोणत्याही हल्ल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्ट मॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. कॉनरच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, घटनेपूर्वी त्याने कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केले नव्हते आणि त्याने असे वर्तन का केले, याबद्दल तिला कल्पना नाहीये.

कॉनर मर्फी युट्युबवर आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, बॉडीबिल्डिंग सल्ले आणि प्रँक व्हिडिओ पोस्ट करायचा. त्याच्या जोरावर त्याने करोडो व्ह्यूज मिळवले होते. त्याचे पिळदार शरीर आणि आत्मविश्वास यामुळे तो अल्पावधीतच इन्स्टाग्राम आणि युट्युबवर प्रचंड लोकप्रिय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT