Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey : पूनम पांडे तुरुंगात जाणार का? फेक न्यूज पसरवल्याप्रकरणी किती शिक्षा होऊ शकते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Poonam Pandey death rumours on social media

पूनम पांडेच्या (Poonam Pandey) मृत्यूची बातमी काल सोशल मीडियावर पसरली होती. तिने एक व्हिडीओ मेसेज जारी करून या बातमीचं खंडन केलंय. कर्करोगाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिनं असं केल्याचं म्हटलंय. तिने त्याच्या चाहत्यांची आणि फॉलोअर्सची माफी मागितली आहे. पण हे प्रकरण तिला भोवणार का, फेक न्यूज पसरवल्याबद्दल तिला तुरूगांत जावं लागेल का, असा प्रश्न निर्माण होत आहे. (Latest Crime News)

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शनिवारी ( 3 फेब्रुवारी) स्वत: पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ती (Poonam Pandey death) जिवंत असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळं मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फेक न्यूज पसरवल्याचे परिणाम

पूनम पांडेने स्वतः इंस्टाग्रामवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी शेअर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर लोकं संतप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, फेक न्यूज पसरवल्याबद्दल पूनम पांडेवर कायदेशीर कारवाई होईल का, हे जाणून घेणं आवश्यक (Poonam Pandey death rumours) आहे.

फेक न्यूज पसरवल्याबद्दल अभिनेत्रीला तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच दंडही आकारला जाऊ शकतो. आयटी कायदा-2000 च्या कलम 67 अंतर्गत, सोशल मीडियावर पहिल्यांदा अफवा पसरवल्याबद्दल कोणी दोषी आढळल्यास, त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ (Poonam Pandey Fake News) शकतो. तसेच 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दोषीला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जनजागृती

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना पूनम पांडे म्हणाली, 'हॅलो मी पूनम आहे. मला माफ करा, मी दुखावलेल्यांची माफी मागतो. माझा उद्देश सर्वांना आश्चर्यचकित करण्याचा होता. कारण, मला गर्भाशयाच्या कर्करोगावर चर्चा करायची होती.मी माझ्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. अचानक आपण सर्वजण गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल बोलू लागलो. हा असा आजार आहे, जो शांतपणे तुमचे आयुष्य हिरावून ( Fake News punishment) घेतो. या आजाराबद्दल अधिक बोलण्याची गरज आहे. मला अभिमान आहे की, माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे सर्वांना या आजाराची माहिती होऊ लागली आहे.

कंगना राणौत, मुनावर फारुकी, डेझी शाह आणि पूजा भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या निधनाच्या बातमीवर दु:ख व्यक्त केलं होतं. कंगना राणौतने इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला होता. पूनम पांडे ( marathi News) त्यांच्या रिॲलिटी शोचा एक भाग होती. तिने दु:ख व्यक्त करत सांगितलं होतं की, हे अत्यंत दुःखद आहे. पूनम पांडेने कधीही तिच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा उल्लेख केला नाही, असं अभिनेत्री संभावना सेठने म्हटलं होतं. खतरों के खिलाडी या रिॲलिटी शोमध्ये संभावना पूनमसोबत सहभागी झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT