अभिनेत्री पूनम पांडेच्या अचानक झालेल्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या निधनाची माहिती मिळताच अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडवरून तिच्या सोशल मीडिया मॅनेजरने मृत्यूचं वृत्त दिलं होतं. एकीकडे तिच्या निधनाची चाहत्यांमध्ये चर्चा होत असताना काही जणांनी तिच्या मृत्यू्च्या वृत्तावर शंका उपस्थित केली जात आहे. चित्रपट समीक्षक आणि पत्रकार उमैर संधूने ट्वीट करत पूनमच्या चुलत बहिणीशी बोललो, हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे तो म्हणाला. (Bollywood News)
पूनम पांडे हिच्या निधनाचे वृत्त ऐकून चित्रपट समीक्षक उमैर संधूने श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर एक्स (ट्वीटर)वर एक ट्वीट करत तिचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलला आहे. तो म्हणाला की, “मी नुकतंच पूनम पांडेच्या चुलत बहिणीशी बोललो. ती जिवंत असून सोशल मीडियावर होत असलेल्या ती चर्चा पाहत आहे. पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट आहे.” उमैर संधूच्या या ट्वीटवर अनेकांनी 'तुला खात्री आहे का ?' असा प्रश्न विचारला आहे. (Social Media)
तर आणखी काही युजर्स म्हणतात, “हा खूपच विचित्र पब्लिसिटी स्टंट आहे.”, “अशी पब्लिसिटी स्टंट करून ती काय साध्य करू पाहतेय ?” असा प्रश्न देखील एका युजरने विचारला आहे. तर एका युजरने त्याच्याकडे थेट प्रुफच मागितला आहे. दरम्यान, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहते अद्यापही बुचकळ्यात पडलेले आहेत. सोशल मीडियावर पूनमच्या मृत्यूच्या वृत्तावरही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पूनमचा मृतदेह कुठे आहे? तिच्या मृतदेहाविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. लोखंडवाला येथे राहणाऱ्या स्थानिकांकडूनही तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजारा मिळालेला नाही. (Poonam Pandey)
शुक्रवारी सकाळी पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. पूनमच्या मॅनेजरने तिचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचं म्हटलं. पूनमच्या मॅनेजरच्या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. अनेकांनी त्या पोस्टवर श्रद्धांजली व्यक्त केल्या. तिच्या मृत्यूच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे तिच्या आईचाही मोबाईल स्विच ऑफ आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.