Pooja Birari Mehndi saam tv
मनोरंजन बातम्या

Pooja Birari Mehndi : बांदेकरांच्या सुनेच्या हातावर रंगली सोहमच्या नावाची मेहंदी, लिहिला होणाऱ्या नवऱ्यासाठी खास मेसेज

Pooja Birari - Soham Bandekar Wedding : मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच बांदेकरांची सून होणार आहे. नुकतीच तिच्या हातावर मेहंदी रंगली आहे. तिने होणाऱ्या नवऱ्यासाठी खास मेसेज देखील लिहिला आहे.

Shreya Maskar

सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

पूजा बिरारीच्या हातावर नुकतीच सोहमच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

पूजाने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला खास मेसेज पाठवला आहे.

सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक कलाकार लग्न बंधनात अडकले आहे. नुकतेच 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरजचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. तर 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मराठी ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही शंभूराज खुटवड यांच्यासोबत 2 डिसेंबर 2025ला लग्न करणार आहे. अशात आता बांदेकरांच्या घरी देखील लगीनघाई पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

सोहम बांदेकर अनेक वेळापासून त्याच्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत होता. सोहम बांदेकर अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari Mehndi) लग्नगाठ बांधणार आहे. खूप वेळापासून यांचे नाते चर्चेत होते. मात्र अलिकडेच त्यांचे केळवण पार पडले. तेव्हा पूजाने सुंदर उखाणा घेतला आणि आपल्या नात्याची कबुली दिली. तिने उखाण्यात बांदेकरांची सून होणार असल्याचे म्हटले आहे. (उखाणा-"घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर" ) अशात नुकताच पूजा बिरारीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. तिच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

पूजाने सोशल मीडियावर मेहंदी कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. पूजाने होणाऱ्या नवऱ्यासाठी एक खास मेसेज देखील दिला आहे. पूजाने मेहंदीच्या फोटोंना हटके कॅप्शन लिहिलं आहे. "सेहरा सजा के रखना..." असे म्हणत पूजाने सोहम बांदेकरला टॅग देखील केले आहे. पूजाने मेहंदी सोहळ्यासाठी खास लूक केला होता. तिने मेहंदी रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. मिनिमल मेकअप, मॅचिंग ज्वेलरी, सुंदर केसांची हेअर स्टाइल करून तिने हा लूक पूर्ण केला होता. पूजा खूपच सुंदर दिसत होती.

पूजाने मेहंदीत एक खास गोष्ट काढली होती. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूजाने हातावर छोटा पप्पीचे चित्र काढले होते. तिच्या चेहऱ्यावर निखळ हास्य आणि आनंद पाहायला मिळत होता. सध्या तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या लग्नाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT