Katrina Kaif Instagram @katrinakaif
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif: कतरिना दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रेमात, भविष्यातील प्लानिंगबाबत केला उलगडा

कतरिनाने व्यक्त केली दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. कतरिना तिच्या चित्रपट, लग्न आणि सोशल मीडियामुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच कतरिनाचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'फोन भूत' प्रदर्शित होणार आहे. सध्या कतरिना त्याच्याच प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान तिने सांगितले की, तिला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल.

कतरिनाने यापूर्वीही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2004 साली प्रदर्शित झालेला तेलगु चित्रपट 'मल्लीस्वरी'मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. 'अल्लारी पिदुगू' या 2005 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात कतरीना नंदामुरी बालक्रिष्ण यांच्यासह दिसली होती. कतरिनाने मल्याळम चित्रपट 'बलराम वर्सेस थरदास'मध्ये सुद्धा काम केले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने तिला भविष्यात काय करायचे यावर स्पष्टीकरण दिले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे तिचा कल आहे आणि याबद्दल तिने सांगितले की, "जर एखादी स्क्रिप्ट खूप इंटरेस्टिंग असेल आणि ते पात्र उत्तम असेल, तर भाषा माझ्यासाठी अडथळा ठरणार नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत अप्रतिम दिग्दर्शक काम करत आहेत." (Katrina Kaif)

"सर्वोत्तम आणि अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मणिरत्नम सरांचा 'पोनियिन सेल्वन: 1'. इतका अप्रतिम चित्रपट, इतका भव्य, सुंदर फ्रेम्स आणि संगीत. त्यांच्या आयुष्यातील या टप्प्यावर एवढा मोठा चित्रपट बनवणे, हे एका प्रतिष्ठित दिग्दर्शकाची क्षमता सिद्ध करते." कतरिनाने,मणिरत्नम आणि त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पोनियिन सेल्वन: 1' ची भरभरून प्रशंसा केली. (Movie)

Katrina Kaif recently shared the motion poster of her upcoming film Phone Bhoot on social media

'फोन भूत' हा कतरिनाचा विक्की कौशलशी लग्न केल्यानंतरचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्याही भूमिका आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT