Ponniyin Selvan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ponniyin Selvan: पोन्नियिन सेल्वनची रेकॉर्डब्रेक कमाई; बाहूबलीला ही टाकले मागे

मनिरत्नम दिग्दर्शित पीएस वन चित्रपटगृहांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र प्रतिसाद चांगलाच मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनिरत्नम दिग्दर्शित पीएस वन चित्रपटगृहांमध्ये (Bollywood Movie) कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र प्रतिसाद चांगलाच मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईमध्ये रोजच घसघशीत वाढ होत आहे. पीएस वन नावाचा हा चित्रपट प्रसिद्ध तमिळ लेखक कल्की कृष्णामूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २७ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली असून चित्रपटाने बाहूबली २ चे ही रेकॉर्ड मोडीत टाकले आहे.

पहिल्याच दिवशी बाहूबली २ने तमिळनाडूमधुन २० कोटी कमवले तर कमल हसनच्या विक्रमने २४ कोटींची ओपनिंग कमाई केली. पोन्नियिन सेल्वनला देशात तसेच परदेशातही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, पोन्नियिन सेल्वनने पहिल्या आठवड्यात परदेशातून ११० कोटींहून अधिक कमाई केली असून त्यावेळी पोन्नियिन सेल्वनने देशभरात २१० कोटींचा व्यवसाय केला आहे. यांसह, पोन्नियिन सेल्वनने प्रदर्शनाच्या एक आठवडाआधी जगभरात सुमारे ३२८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

पोन्नियिन सेल्वनच्या हिंदी भाषिक चित्रपटाने सात दिवसांत १४.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तामिळनाडूतील पोन्नियिन सेल्वनने आतापर्यंत १३६ कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. चित्रपटाने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या चार भाषांमध्ये आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT