Bigg Boss Marathi Season 4: बिग बॉसच्या घरात अनेक इतिहास मोडीत; पहिल्यांदाच महिला कॅप्टनपदी विराजमान

नेहेमीप्रमाणे यावेळीही कॅप्टॅन्सीकरिता टास्क पार पडले होते. पहिल्या कॅप्टन्सीचे उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.
Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4Instagram/@bbmarathi

मुंबई: सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत (Entertainment News) सर्वात चर्चीत मुद्दा म्हणजे बिग बॉस ४ चा. चौथे पर्व सुरु झाल्यापासून सर्वच सदस्यांमध्ये जोरदार भांडणं होत आहेत. बिग बॉसच्या घरात बऱ्याच सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये वादविवाद होताना दिसून येतात. सोबतच त्यांच्यात तेवढी धम्माल मस्तीही होताना दिसते. नेहेमीप्रमाणे यावेळीही कॅप्टॅन्सीकरिता टास्क पार पडले होते. पहिल्या कॅप्टन्सीचे उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. अखेर कॅप्टन झालेल्या सदस्याचे नाव प्रेक्षकांच्या समोर आले आहे.

Bigg Boss Marathi 4
Makrand Anaspure: जाहिराती मिळाल्या नाही तर तुम्ही गरीब होणार नाही, मकरंद अनासपुरेंनी कलाकारांचे टोचले कान

पहिल्या कॅप्टनचे नाव अखेर समोर आले आहे. त्या सदस्याचे नाव समृद्धी जाधव आहे. समृद्धीला यंदाचे कॅप्टनपद मिळाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) नुकतेच बिग बॉसच्या घरात आपली हजेरी लावली होती (Marathi Actors). त्याचा आगामी चित्रपट 'आपडी थापडी'मुळे त्याने बिग बॉसच्या घरात आपली हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने सांगितले की, बिग बॉसच्या चारही सीझनमध्ये पहिल्यांदाच महिला स्पर्धक कॅप्टनपदी विराजमान झाली आहे.

Bigg Boss Marathi 4
Makrand Anaspure: जाहिराती मिळाल्या नाही तर तुम्ही गरीब होणार नाही, मकरंद अनासपुरेंनी कलाकारांचे टोचले कान

बिग बॉसच्या घरात डान्स पे चान्स या उपकार्यात टीम A ने विजयी मिळवला असून चौथ्या सीझनमधील पहिल्याच साप्ताहिक कार्यात टीम A विजयी झाली आहे. विजयी झालेल्या साप्ताहिक कार्यातील टीममधील एका सदस्याला आठवड्यातील कॅप्टनपदाचा उमेदवार होण्याची संधी मिळते. तेजस्वी लोणारी आणि समृद्धी जाधव यांच्यात कॅप्टन्सीपदासाठी झालेली शेवटची लढाई समृद्धी जाधव जिंकली. या आठवड्यातील पहिल्या महिला कॅप्टनचे नाव समृद्धी आहे.

श्रेयसने काल बिग बॉसच्या घरात आला आहे. त्याच्या येण्याने प्रेक्षकांना सध्या तरी प्रेक्षकांना सुख:द धक्का मिळाला आहे. पण तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला की, बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला हे आजच्याच भागात स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com