Politician Reaction On Nitin Desai's Suddenly Demise
Politician Reaction On Nitin Desai's Suddenly Demise Instagram
मनोरंजन बातम्या

Politicians on Nitin Desai: टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाईंचे वेगळे ऋणानुबंध; CM शिंदेंनी दिला आठवणींना उजाळा

Chetan Bodke

Politician Reaction On Nitin Desai's Suddenly Demise:

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Marathi Director Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एन.डी.स्टुडिओमध्ये (N.D.Studio) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणतात, “ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणतात, टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला. त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो.”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीटच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांति”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, “राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, “राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

IND VS ZIM : कर्णधार शुभमन गिलने लाजिरवाण्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? पाहा व्हिडिओ

Special Report: Manoj Jarange: जरांगेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT