सचिन जाधव
Rap Songs Shot Without Permission Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी रॅप साँगचे शूटिंग केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिसरातील केलेल्या या कृतीमुळे वाद निर्माण झाला आहे. रॅप साँगमध्ये आक्षेपार्ह शब्द असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
शिव्यांचा भडीमार असलेल्या रॅप साँगमध्ये विद्यापीठाने परवानगी कशी दिली याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे यांनी केली कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. सल्तनत नावाचे रॅप साँग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आले आहे. या रॅप साँगमध्ये दारु, बंदूक, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी या गाण्यावर आक्षेप घेत कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.
या रॅप साँगला कुलगुरूंनी परवानगी कशी दिली याविषयी माहिती द्यावी, एवढ्या मोठया विद्यापीठात हे घडतच कसं? याला कोण जबाबदार आहे याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कडुन करण्यात आली आहे.तक्रार केल्यानंतर युट्युबवरून साँग काढण्यात आले आहे. मुलांनी विद्यापीठात घुसून घुसखोरी करत शूट केल्याचे विद्यापीठ सांगत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग बनवल्या प्रकरणी चतुरशुर्गी पोलीसात विद्यापीठाकडून केली तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी रॅप साँग बनवणाऱ्या चार-पाच मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विनापरवानगी विद्यापीठात रॅप साँग बनवल्याचा मुलांवर आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.