Pm Modi Shared Hariharan Ram Bhajan Instagram
मनोरंजन बातम्या

Pm Modi Shared Ram Bhajan: हरिहरन यांचं भजन ऐकून तुम्हीही श्रीरामाच्या भक्तीत व्हाल तल्लीन , PM मोदींनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

Chetan Bodke

Pm Modi Shared Hariharan Ram Bhajan

येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यावेळी फक्त देशातील बड्या नेत्यांनाच नाही तर, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

बॉलिवूडसह टॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याची अवघ्या देशभरामध्ये अगदी जोमाने तयारी सुरु आहे. (Bollywood)

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर हरिहरन यांनी गायलेल्या रामलल्ला यांच्या भजनाचा एक व्हिडिओ पोस्ट करत गाण्याचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. नुकतंच पंतप्रधानांनी आपल्या एक्स (ट्विटर)वर गायक हरिहरन यांनी गायलेल्या राम लल्ला यांच्या भजनाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हरीहरन यांच्या आवाजाने सर्वच तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे.

"हरीहरनजींच्या अद्भूत सुरांनी सजलेले हे रामलल्लांचं भजन सर्वांनाच भक्तीत तल्लीन करणारं आहे. तुम्हीही हे भजन ऐकूण भक्तीत तल्लीन व्हा..." अशी पोस्ट पंतप्रधानांनी एक्स (ट्विटर)वर शेअर केली आहे. (Social Media)

त्यासोबतच सध्या सोशल मीडियावर 'राम आयेंगे' या गाण्याची सुद्धा जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे गाणं गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया पोस्टवर, स्टोरीवर शेअर करताना पाहायला मिळत आहे. या गाण्याचा देखील व्हिडीओ पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण देखील मिळालेले आहे. त्याबद्दलची माहिती त्यांनी एक्स (ट्विटर)वर शेअर केलेली आहे. राम मंदिर ट्रस्टकडून देशातील महत्वाचे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी मंडळींसह अनेक मान्यवरांना सोहळ्याला निमंत्रण दिले आहे. (Entertainment News)

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमासाठी बॉलिवूडचे बिग बी अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचसोबत, अक्षय कुमार, कंगना रनौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी या बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.

तर टॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये, साऊथ सुपरस्टार रजनीकांत, प्रभास, केजीएफ स्टार यश, धनुष, चिरंजीवी, कांतारा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.

२२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील एकूण ७ हजार नामवंत व्यक्तींना निमंत्रण पत्र देण्यात आले आहे. (Ram Mandir)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT