Playback Singer Asees Kaur Gets Married Instagram @aseeskaurmusic
मनोरंजन बातम्या

Asees Kaur - Goldie Sohel Wedding : प्रसिद्ध सिंगर असीस कौर आणि कंपोजर गोल्डी सोहेल गुपचूप अडकले लग्नबंधनात

Asees Kaur - Goldie Sohel Share Post : गायिकेने नवरा गोल्डीसोबतचे लग्नाचे फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Pooja Dange

Playback Singer Asees Kaur Gets Married: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका असीस कौरने तिच्या जीवनातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. गायिकेने शनिवारी तिचा प्रियकर आणि संगीतकार गोल्डी सोहेलसोबत लग्नगाठ बांधली आहे. गायिकेने नवरा गोल्डीसोबतचे लग्नाचे फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

असीस कौर आणि गोल्डी सोहेल यांनी आनंद-कराज परंपरेनुसार लग्न केले. इन्स्टाग्रामवर दोघांनी पोस्ट शेअर करून त्याच्या जीवनातील ही गोड बातमी शेअर केली आहे. या कपलने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वाहेगुरु तेरा शुक्र है." लग्नाच्या फोटोंमध्ये हे कपल एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसत आहेत. (Latest Entertainment News)

कपलच्या वेडिंग लूकविषयी बोलायचे झाले तर, दोघेही पेस्टल लूकमध्ये सुंदर दिसत आहेत. असीस कौरने पेस्टल गुलाबी सलवार-सूट घातला होता आणि तिचे डोके चुनरीने झाकले आहे. डायमंड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमध्ये वधू खूपच सुंदर दिसत आहे. तर, गोल्डीने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे आणि असीसच्या लेहेंग्याशी मॅचिंग करणारी गुलाबी पगडी घातली होती.

असीस आणि गोल्डीच्या लग्नाचे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाने कमेंटमध्ये लिहिले की, "ओह माय गॉड, असीस आणि गोल्डीचे अभिनंदन. ही जोडी ब्लॉकबस्टर आहे." हिना खान म्हणाली, "अभिनंदन असीस. तुझ्यासाठी खूप आनंद झाला." याशिवाय गौहर खानपासून ध्वनी भानुशालीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

असीस कारणे खूप लहान वयातच गायनाला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगरने वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी गुरबानी गाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'आवाज पंजाब दी' आणि 'इंडियन आयडॉल' सारख्या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. असीस कौरने तिच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली, पण तिला सर्वाधिक लोकप्रियता 'शेरशाह'मधील 'रतां लांबियां' या गाण्याने मिळाली.

असीस कौर आणि गोल्डी सोहेल 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या कपलने पानिपत आणि गुवाहाटी येथील त्यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबासह गुरुद्वारामध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. आयडीजीएएफमध्ये काम करत असताना या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा साखरपुडा झाला. लग्नानंतर, ते गोल्डन टेंपलकडे जाणार आहेत आणि त्यानंतर लंडनमध्ये एक कार्यक्रम होईल, त्यानंतर ते त्यांच्या हनीमूनला जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT