Gemadpanti Teaser  Instagram
मनोरंजन बातम्या

Gemadpanti Teaser: बेगम, बादशाह, गुलाम..आणि ...गेम! बोल्ड सस्पेन्स असणाऱ्या ‘गेमाडपंथी’चा टीझर प्रदर्शित

‘गेमाडपंथी’ या वेबसीरिजचे जबरदस्त बोल्ड टिझर सोशल मीडियावर झळकले आहे.

Chetan Bodke

Gemadpanti Teaser Out: हेमाडपंथी... दगड एकमेकांत गुंफून केलेल्या बांधकामाची एक स्तुत्य शैली. आपण सर्वांनीच या शैलीचा इतिहासात अभ्यास केलेला आहे. हेमाडपंथीशीच साधर्म्य साधणारा शब्द म्हणजे ‘गेमाडपंथी’. ‘गेमाडपंथी’... नाव ऐकूनच थोडं आश्चर्य वाटलं ना? ही कोणती नवीन शैली? तर दगड एकमेकांच्या डोक्यात घालून केलेल्या गेमची एक शैली. ही शैली नेमकी काय आहे, तर याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे, प्लॅनेट मराठी ओटीटीवर.

नुकतेच ‘गेमाडपंथी’ या वेबसीरिजचे जबरदस्त बोल्ड टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. अ प्लॅनेट मराठी ओरिजनल, दि फिल्म क्लिक स्टुडिओज प्रस्तुत, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग अशी तगडी स्टारकास्ट आहे. (OTT)

टिझरमध्ये सुरुवातीलाच पूजा कातुर्डे मादक अंदाजात दिसत असून प्रणव रावराणेला ती तिच्या प्रेमाच्या जाळयात ओढत आहे. तर दुसरीकडे कोणाला तरी किडनॅप करण्याचा प्लॅन शिजत असल्याचे कळतेय. आता हे किडनॅपिंग कोणाचे आणि कशासाठी आहे, हे ‘गेमाडपंथी’ प्रदर्शित झाल्यावरच कळेल. दरम्यान टिझरवरून ही वेबसीरिज बोल्ड कॉमेडी दिसतेय. (Latest Entertainment News)

‘गेमाडपंथी’ बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्लॅनेट मराठीने आतापर्यंत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. हासुद्धा कॅामेडीचा वेगळा जॅानर आहे. ही वेबसीरिज शहरी प्रेक्षकांसोबतच ग्रामीण प्रेक्षकांनाही आवडेल अशी आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची दमदार फळी असून सगळे विनोदवीर एकाच ठिकाणी जमले आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार. ‘गेमाडपंथी’मध्ये बोल्ड सस्पेन्स असल्याने शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारी ही सीरिज आहे. असे हलकेफुलके विषय प्रेक्षकांना आवडता. लवकरच ‘गेमाडपंथी’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मिनी विधानसभेचं संभाव्य वेळापत्रक समोर, ८ दिवसात बिगुल वाजणार?

Sharad Pawar : विरोधकांचा सत्याचा मोर्चा, ठाकरे बंधूंसह शरद पवार सहभागी होणार | VIDEO

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरातून हा स्पर्धक पडला बाहेर; चाहत्यांना बसला मोठा धक्का

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Rain Alert : पावसाचा मुक्काम आणखी वाढला,नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT