Jr NTR In War 2: 'RRR' चित्रपटातून हिंदी प्रेक्षकांची मने जिंकणारा दक्षिण अभिनेता ज्युनियर एनटीआरचा आज 20 मे रोजी वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. नुकतीच मिळालेल्या बातमीनुसार ज्युनियर एनटीआर 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आता खुद्द हृतिकने याबाबत इशारा दिला आहे. हृतिकने ज्युनियर एनटीआरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, याबाबत माहिती दिली आहे.
ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हृतिक रोशनने कॅप्शनमध्ये लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्युनिअर एनटीआर! तुम्हाला हा दिवस खूप आनंदाचा जावो आणि पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. रणांगणावर तुझी वाट पाहतोय मित्रा. तुझा दिवस आनंदात आणि शांततेत जावो… जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही. यासोबत हृतिकने इमोजीचा देखील पोस्ट केला आहे. (Latest Entertainment News)
ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशनने ही पोस्ट शेअर करताच, त्याने 'वॉर 2' मध्ये ज्युनियर एनटीआरच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केला असल्याची व पसरली होती. चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ट्विटरवर सध्या #War2 ट्रेंड करत आहे.
'वॉर' चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता आणि यशराज फिल्म्सने निर्मिती केली होती. YRF Spy Universe मधील हा तिसरा चित्रपट आहे. यामध्ये हृतिक रोशन, टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते आणि वाणी कपूर, आशुतोष राणा, अनुप्रिया गोएंका यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अयान मुखर्जी या चित्रपटाच्या सिक्वेलची कमान सांभाळणार आहे. ऋतिक रोशन आणि जूनियर एनटीआर व्यतिरिक्त 'वॉर 2' मध्ये शब्बीर अहलुवालिया देखील दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.