'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga Update) मालिकेत गोंडस पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. यामुळे पिंगा गर्ल्स घरी धुमाकूळ घालत आहेत. अलिकडेच मालिकेतील कोर्ट ड्रामाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. श्वेता आणि मिठूवर झालेल्या अन्यायाविरुद्ध सुरू झालेली लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. कोर्टाचा निकाल श्वेता आणि मिठूच्या बाजूने लागल्याने त्यांच्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. मिठूवर झालेल्या हल्ल्यानंतर तिची प्रकृतीही आता सुधारते आहे. पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात आलेल्या नवीन पाहुणा नक्की कोण, जाणून घेऊयात.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत गोंडस बाळाची एन्ट्री झाली आहे. समोर आलेल्या प्रोमोनुसार पिंगा गर्ल्स बाळाला सांभाळताना दिसत आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे बाळाच्या आगमनानंतर म्हणाली की, "बाळ सेटवर आल्यापासून खूपचं शांतता पसरली आहे. खास करून मी आणि विदिशा म्हसकर जे गोंगाट घालायचो आता कमी झाला आहे. आम्ही दोघी तेव्हा सेटवरची लहान बाळं होतो पण आता जरा चित्र बदलले आहे. बाळ आल्यापासून आमची जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे आम्ही जोरात बोलत नाही. आवाज करत नाही. प्रोडक्शन बाळाची खूपंच काळजी घेतं आहे. पुढे ऐश्वर्या म्हणाली की, बाळाचे शॉट्स पहिले घेतले जातात. बाळ खूप हसरं आहे. हे बाळ सेटवर सकारात्मकता घेऊन आले आहे. बाळासाठी खूप छान वेगवेगळ्या प्रकारची खेळणी घेतली आहेत."
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर म्हणाली की, "बाळ फारंच गोंडस आहे. माझ्या आणि आकांक्षा गाडेच्या मेकअप रूममध्ये हे बाळ आहे. त्यामुळे आमची तारांबळ उडाली आहे. मालिकेत आणि ऑफस्क्रीन सुद्धा. कसं असतं ना मेकरूममध्ये चर्चा होते, मोठ्याने गाणी ऐकली जातात पण आता सगळंच बदलले आहे. आमच्या सेटसारखी आमची मेकअप रूम सुद्धा आता शांत असते कारण आमचा वेळ आता बाळासोबत कसा जातो कळत नाही."
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत केसमध्ये मिळालेल्या विजयाबरोबरच आता वल्लरी आणि पिंगा गर्ल्ससमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. एका नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. हे बाळ कोण आहे? याच्या येण्याने या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात काय बदल घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मैत्री, संघर्ष आणि जबाबदारी यांचे नवीन मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.