'पिंगा ग पोरी पिंगा' मालिकेत सध्या 'तेजाकीशादी' पाहायला मिळत आहे.
पिंगा गर्ल्सने लाडक्या मैत्रिणीच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.
लग्न सोहळ्यातील कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
'पिंगा ग पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिकेत तेजा–हर्षितचं लग्न सोहळा होताना दिसत आहे. प्रेक्षक यासाठी खूपच उत्सुक आहेत. पिंगा गर्ल्स मिळून तेजाकीशादी लावून देणार आहेत. सगळ्या विधी आनंदाने लग्न सोहळ्यात पार पडणार आहेत. साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद अशा सर्व समारंभांची रंगत आणि शेवटी विवाहसोहळा असा मोठा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
तेजा-हर्षितचा शुभविवाह 16 नोव्हेंबर संध्यााकळी 7 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. इंदूरचा मुलगा अन् मुंबईची मुलगी असल्यामुळे ही लव्ह स्टोरी खूपच खास आहे. मुलगा- मुलीच्या पत्रिका तपासण्याच्या हट्टावरून हर्षितच्या आईमुळे तेजा हर्षितमध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळे तेजा हे लग्न मोडण्याचा निर्णय घेते. तेव्हा वल्लरी तेजाच्या बाजूने उभी राहते. तसेच पहिल्यांदाच हर्षित आपल्या आईच्या वागण्याचा विरोध करत तेजाची बाजू घेतो. मनोज–वल्लरीच्या पाठिंब्यामुळे तेजा पुन्हा लग्नाला तयार होते.
सगळ्या अडचणींवर मात करत आता तेजा -हर्षित चे लग्न मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे. लग्नाच्या दिवशी मैत्रीतल्या एकजुटीचा सुंदर क्षण पाहायला मिळेल. या सर्वात लग्नातील 'कन्यादान' हा प्रसंग मात्र मालिकेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नवा दृष्टिकोन पुन्हा पिंगा गर्ल्स देणार आहेत. यात काही खास गोष्टी पाहायला मिळणार आहे. मुला-मुलीचे दोघांचे आई-वडील समान असून लग्नातील काही विधी पिंगा गर्ल्स आपल्या स्टाइलमध्ये करताना दिसणार आहेत.
तेजा–हर्षितचे लग्न स्त्री–पुरुष समानतेबद्दल, कुटुंबातील परस्पर आदराबद्दल आणि परंपरेचा सन्मान ठेवत नव्या विचारांना स्थान देण्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात विचार निर्माण करणारा ठरेल. तेजा–हर्षितच्या लग्नानंतर 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.