Phullwanti Success Party SAAM TV
मनोरंजन बातम्या

Phullwanti Success Party : फुलवंती अन् चंद्राची जुगलबंदी; चाहत्यांच्या नजरा खिळल्या, पाहा VIDEO

Phullvanti VS Chandra : 'फुलवंती' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर थिरकल्या. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

सध्या प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या 'फुलवंती' ( Phullwanti Success Party) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ताच्या 'फुलवंती' चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. तसेच या चित्रपटामुळे प्राजक्तालाही खूप प्रसिद्धी मिळाली.

'फुलवंती' हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे. 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. 'फुलवंती' चित्रपटाला जगभरात खूप चांगली प्रतिसाद मिळाला. तसेच चित्रपटाने छप्परफाड कमाई देखील केली. यामुळे 'फुलवंती'च्या यशाची सक्सेस पार्टी नुकतीच पार पडली. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

फुलवंती अन् चंद्राची जुगलबंदी

'फुलवंती'च्या सक्सेस पार्टीमध्ये 'चंद्रा' म्हणजे अमृता खानविलकरने चार चाँद लावले. प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) 'मदनमंजिरी' (Madanmanjiri Song) गाण्यावर सुंदर डान्स केला. चाहत्यांना फुलंवती आणि चंद्राची जुगलबंदी पाहायला मिळाली. वैशाली माडे हीने पार्टीमध्ये 'मदनमंजिरी' हे सुरेल गाणे गायले. तिच्या गाण्याने सर्वांनाच भारावून टाकले.

'फुलवंती' चित्रपटातील 'मदनमंजिरी' हे गाणे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या गाण्याची सोशल मीडियावर आजही हवा पाहायला मिळत आहे. 'फुलवंती' चित्रपटात प्राजक्ता माळीने आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावले आहे.'फुलवंती'चित्रपटात प्राजक्ता माळी नर्तिकाच्या भूमिकेत दिसली आहे. तिच्या सोबत मुख्य भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आहे.

प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोवर्स आहे. ती इंस्टाग्रामवर तिच्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना अपडेट देते. तसेच आपले विविध फोटो शेअर करत राहते. तिचे सुरेख फोटो पाहून चाहते घायाळ होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT