Phule movie controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phule Movie Controversy: 'ही लव्ह स्टोरी आहे, हेट स्टोरी नाही'; 'फुले' चित्रपटावरून दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

Phule Movie: प्रतीक गांधी आणि पत्रलेखा अभिनीत 'फुले' हा हिंदी बायोपिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

Shruti Vilas Kadam

नितीन पाटणकर, साम टिव्ही

Phule movie controversy: महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा बायोपिक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी महात्मा जोतिबा फुलेंची भूमिका साकारणार आहे. तर, पत्रलेखा सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून काही संघटनांनी आक्षेप घेतला असून, त्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

अनंत महादेवन म्हणाले, "ट्रेलरवरून अनुमान लावू नका, संपूर्ण चित्रपट पाहा. त्यांनी सांगितलं की, चित्रपट पूर्णपणे बॅलन्स आहे, अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि कोणताही सीन कट करण्यात आलेला नाही. ओबीसी संघटनांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की, कोणताही सीन हटवू नका.

चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून U सर्टिफिकेट देण्यात आलं असून, केवळ काही बदल सुचवले गेले आणि ते मान्य करून केले गेले आहेत. त्यांनी यावरही भर दिला की, हा चित्रपट ब्राह्मणविरोधी नाही. उलट महात्मा फुले आणि ब्राह्मण समाज यांचं नातं "लव्ह स्टोरी"सारखं आहे, "हेट स्टोरी"सारखं नाही.

चित्रपटाची रिलीज डेट दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली असून, अनंत महादेवन म्हणाले की, "मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मला अभिमान आहे. हा चित्रपट समाजाला फुलेंचा विचार समजावून सांगणारा आहे." मुळतः ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असलेला 'फुले' हा चित्रपट आता दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला असून, नवीन प्रदर्शन तारीख २५ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिदेवाची कृपा बरसणार! 'या' ६ राशींच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले; व्यवसाय-नोकरीत होणार प्रगती

Pune Police: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी अन् ११ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली; पोलीस दलात खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन

Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल झणझणीत पाव भाजी; वाचा सोपी रेसिपी

Pear: बाजारातून गोड आणि रसाळ पेर निवडायचंय? खरेदी करताना हे ४ उपाय लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT