Social Media Star Passed Away: पाकिस्तानात ‘पीछे तो देखो’ या संवादामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेला लहान मुलगा अहमद शाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी अत्यंत दुःखद कारणामुळे. अहमद शाहचा लहान भाऊ उमर शाह याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
अहमद शाहने काही वर्षांपूर्वी आपल्या गोंडस आणि मजेदार व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर फेमस झाला होता. त्याच्या गोड बोलण्यामुळे आणि हसऱ्या स्वभावामुळे तो पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही प्रचंड लोकप्रिय झाला. पण आता त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अहमद शाहचा लहान भाऊ उमर याला सोमवारी १५ सप्टेंबर रोजी अचानक कार्डिएक अरेस्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तान तसेच भारतातील सोशल मीडिया युजर्सनी शोक व्यक्त केला आहे.
एक आठवडा जुना व्हिडिओ व्हायरल
अहमद शाहचे इंस्टाग्रामवर ८४२ हजार फॉलोअर्स आहेत. त्याचा भाऊ उमरसोबतचे अनेक फोटो आणि रील तो पोस्ट करत असतो. अहमदच्या पेजवर सात दिवस जुना रील आहे ज्यामध्ये तो त्याचा भाऊ उमरसोबत शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट येत असून नेटकरी शोक व्यक्त करत आहेत..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.