Yaariyan 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yaariyan 2 : पुन्हा अनुभवा 'दिल दोस्ती दुनियादारी'; 'यारिया २'चे पोस्टर आऊट

Yaariyan 2 Movie Poster Out : 'यारिया २' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yaariyan 2 First Look Poster

२०१४ साली मित्र, प्रेम या नात्यावर भाष्य करणारा 'यारिया' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तरुणाईला या चित्रपटाला वेड लावले होते. प्रेक्षकांची चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आहे.

यारिया चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केले होते. चित्रपटाच्या यशानंतर ९ वर्षांनी चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Latest Entertainment News)

यारियानंतर ९ वर्षानंतर यारिया '२ चित्रपट' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतच चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

यारिया २ मध्ये नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांनी सोशल मीडियावरुन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दिव्या खोसला कुमार नवरीच्या वेशात दिसत आहे. दिव्याचा एक हात मीजान जाफरीच्या खांद्यावर आहे तर दुसरा हात पर्ल वी पुरीच्या खांद्यावर आहे. पोस्टरमध्ये पर्ल वी पुरी मीजानकडे रागाने बघताना दिसत आहे.

चित्रपटात हे त्रिकुट दिसणार आहे. यारिया २मध्ये पर्ल वी पुरी पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहे. 'कजिन्स बाय ब्लड, फ्रेंड्स बाय चॉईस' असं कॅप्शन दिले आहे. कॅप्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या हटके पोस्ट आणि त्यावरील कॅप्शनमुळे प्रेक्षकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरवात केले आहेत.

यारिया चित्रपट मैत्री, प्रेम या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे यारिया २ मध्ये काय नवीन पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

यारिया चित्रपटात हिमांश कोहली आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटामुळे रकुल प्रीतला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली असे म्हणायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT