Ankita Lokhande Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Birthday : छोट्या पडद्यावरची सून ते बिग बॉसची क्वीन; अंकिता लोखंडे आहे कोट्यवधींची मालकीण

Ankita Lokhande Net Worth : टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आज ४० वर्षांची झाली आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. वाढदिवसानिमित्त अंकिताची एकूण संपत्ती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पवित्र रिश्ता' या मालिकेपासून करिअरला सुरुवात करणारी मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) आज वाढदिवस आहे. अंकिता आज 40 वर्षांची झाली आहे. तिने मनोरंजन सृष्टीत आपली स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आज अंकिता लोखंडे कोट्यवधींची मालकीण आहे.

'पवित्र रिश्ता' नंतर अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' मुळे खूप गाजली. तिचा बिग बॉसचा गेम अनेक चाहत्यांना आवडला. आजवर अंकिताने अनेक मालिका, शो केले आहेत. ती कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहीली आहे. अंकिताचा मोठा चाहता वर्ग आहे. ती आता एक लग्जरी लाइफ जगत आहे. एवढी वर्ष इंडस्ट्रीत काम करून अंकिता आता किती कोटींची मालकीण झाली आहे, जाणून घ्या.

अंकिता लोखंडे मालमत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 17'साठी अंकिता लोखंडेला आठवड्यासाठी 11-12 लाख रुपये दिले जात होते. अंकिता मुंबईत नवऱ्यासोबत ८ BHK घरात राहते. तसेच तिचा मालदीवला एक खाजगी व्हिला आहे, जो विकीने अंकिताला गिफ्ट केला आहे. हा आलिशान व्हिला ५० कोटी रुपयांचा आहे. अंकिता लोखंडेची एकूण संपत्ती 25-30 कोटींमध्ये आहे. अंकिता लोखंडेकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. ज्यात पोर्श 718 बॉक्सस्टर कार, जग्वार XF, मेरीसीडीज यांचा समावेश आहे. या सर्व कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

अंकिता लोखंडेने २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. विकी आणि अंकिता मुंबईत आलिशान घरात राहतात. अंकिताचा नवरा विकी जैन 'महावीर इंस्पायर ग्रुप ' या कंपनीचा मालक आहे.मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनच्या कोशळाच्या खाणी देखील आहेत. अंकिता लोखंडेने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिचा 'मणिकर्णिका' हा चित्रपट खूप गाजला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT