Patthe Bapurao Biopic Announcement
Patthe Bapurao Biopic Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Patthe Bapurao Biopic Announcement: शाहीर साबळेंनंतर आणखी एका लोकशाहीराचे जीवनचरित्र उलगडणार रुपेरी पडद्यावर, ‘पठ्ठे बाबुराव’चं पोस्टर रिलीज

Chetan Bodke

Patthe Bapurao Biopic Announcement

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्रीतही सध्या बायोपिकची क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहीर साबळे यांची जीवनगाथा आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. अशातच आणखी एका बायोपिकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

शाहीर परंपरेतलं लोकप्रिय नाव लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर लवकरच एक नवाकोरा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ‘पठ्ठे बाबुराव’ या चित्रपटाचंही तो दिग्दर्शन करणार आहे. शाहिरी परंपरेमध्ये अजरामर असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट ‘पठ्ठे बाबुराव’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आणणार आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर दिसणार आहेत. प्रसाद ओक ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांचे पात्र तर अमृता खानविलकर ‘पवळा’ ही भूमिका साकारणार आहे.

श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत ‘पठ्ठे बाबुराव’ या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचल्या आहेत. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. मात्र त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.

स्वरुप स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या प्रकाश देवळे,सपना लालचंदानी हे "पठ्ठे बापूराव" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

IND VS ZIM : कर्णधार शुभमन गिलने लाजिरवाण्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT