Shah Rukh Khan flaunts six abs Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानने शर्टलेस होऊन दाखवले सिक्स अॅब्स; फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

शाहरुख खानने सोशल मीडियावर हटके फोटो पोस्ट करत 'पठाण'ची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan News : शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही काळात त्याने मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात काम केलेले नाही. परंतु येणाऱ्या वर्षात त्याचे ३ चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुखच्या त्या चित्रपटाची नावेही चाहत्यांच्या समोर आली आहेत. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या तिन्ही चित्रपटांबद्दल बरीच चर्चा सुरु आहे आणि चाहते त्याच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खानचा पठाण (Pathan)या चित्रपटातील लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. शाहरुख खानने त्याच्या याच लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने "मी देखील 'पठाण'ची वाट बघतोय" असं म्हटले आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस असून त्याचे सिक्स पॅक दाखवत आहे. या फोटोतून हे लक्षात येते की त्याने ह्या भूमिकेसाठी चांगली मेहनत घेतलेली आहे. त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. फोटो (Photo) शेअर करताना त्याने अमिताभ बच्चन यांच्या 'सिलसिला' चित्रपटातील कविताही शर्टला उद्देशून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

'पठाण'या चित्रपटात शाहरुख खान स्पायची भूमिका साकारणार आहे. गुप्तहेर आणि दहशतवादी यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने (Movies)केलेली असून सिद्धार्थ आनंद यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शाहरुखसह या चित्रपटात जॉन अब्राहम,दीपिका पदूकोण हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. जानेवारी २०२३ साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT