Pathaan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Craze In France: भारतासह परदेशात रंगली 'पठान'ची चर्चा, शाहरुख खान झाला फ्रान्सच्या टीव्हीवर हिट

शाहरुखच्या 'पठान'ची चर्चा आता फ्रेंच न्यूज चॅनेलवर सुद्धा चर्चा होत आहे.

Pooja Dange

Viral Video Of Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने भारतासह जगभरात धुमाकूळ घातला आहे. ४ वर्षांनी आलेला शाहरुखचा आहे चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरला आहे. 'पठान' ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुखच्या 'पठान'ची चर्चा आता फ्रेंच न्यूज चॅनेलवर सुद्धा चर्चा होत आहे. या न्यूज चॅनेलने शाहरुखला 'मॅन ऑफ द डे' सुद्धा म्हटलं आहे.

शाहरुख खानच्या फॅन पेजने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ फ्रांसच्या एका प्रसिद्ध चॅनलवरील ली 1245 या कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये अँकर शाहरुखच्या स्टारडमचे गुणगान गात आहे. तसेच ग्लोबल सुपरस्टार म्हणत शाहरुखला 'मॅन ऑफ द डे' उपाधी दिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लोक कसे शाहरूखच्या 'पठान'चे कौतुक करत आहेत. तसेच ते शाहरुखचे किती मोठे फॅन आहेत हे सांगत आहेत.

किंग खानच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे, याचा या व्हिडिओवरून स्पष्टपणे अंदाज लावता येतो. ३० वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. शाहरुख खानचे नाव जगातील टॉप 5 श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे.

भारतात बक्कळ कमाई करणाऱ्या 'पठान' या चित्रपटाला परदेशात सुद्धा यश मिळाले आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, शाहरुख खानच्या 'पठान'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी परदेशात 36 कोटींची बंपर ओपनिंग केली आहे. यावरून किंगचे आकर्षण जगभरात आहे हे कळून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT