Pathaan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Trailer Release Tomorrow: 'मिलते है मैदान पर...' 'पठान'बाबत शाहरुखने केलेल्या ट्वीटचा अर्थ काय?

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शिच होणार हा प्रश्न अनेकदा चाहत्यांनी विचारला होता. अखेर चाहत्यांना त्याचे उत्तर मिळाले आहे.

Chetan Bodke

Pathaan Trailer Release Tomorrow: शाहरुख- दीपिका प्रमुख भूमिकेत असलेला 'पठान' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. चित्रपटातील दीपिकाच्या बिकिनीवरुन हा चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शिच होणार हा प्रश्न अनेकदा चाहत्यांनी विचारला होता. अखेर चाहत्यांना त्याचे उत्तर मिळाले आहे.

'पठान' चित्रपटाचा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता सोशल मीडियावर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा शाहरुखने सोशल मीडियावर केली आहे. अखेर चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार असून सर्वांनाच चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापुर्वीच परदेशात चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे. काही देशांमध्ये चित्रपटाचे जवळपास फेब्रुवारीच्या आसपास तिकीट बुक झाले आहेत. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आणखी किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतात चित्रपटाची प्री- बुकिंग १४ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची सध्या चर्चा होत आहे.

'पठान' चित्रपटातील दीपिकाच्या बिकिनीवादावरुन सर्वत्र चित्रपटावर टीका- टीप्पणी केली जात होती. चित्रपटातील काही भागही सेन्सॉर बोर्डने कट करण्याचेही सांगितले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT