Pathaan
Pathaan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Controversy : 'पठान' सिनेमाविरोधात बजरंग दल आक्रमक; चित्रपटगृह चालकांना दिला 'हा' इशारा

विजय पाटील

सांगली : शाहरुख खानचा 'पठान' रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. 'बेशरम रंग' या गाण्यामुळे हा चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात सापडला. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांत शाहरुख खानच्या चित्रपटाला विरोध होत आहे. तर महाराष्ट्राच्या सांगलीतही बजरंग दलाने शाहरुख खानच्या 'पठान' सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'पठान' सिनेमा प्रदर्शित करू नये, असा इशारा बजरंग दलाने चित्रपटगृहांना दिला आहे. (Latest Marathi News)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. राज्यभरात उद्या प्रदर्शित होणाऱ्या 'पठान' चित्रपटाविरोधात सांगलीत (Sangli) बजरंग दल आक्रमक झाले आहे.

'पठान' चित्रपट प्रदर्शित झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. आज बजरंग दलाने सांगली आणि मिरजेतील सर्व चित्रपटग्रह चालकांची भेट घेऊन त्यांना 'पठान' चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये अशी विनंती केली.

चित्रपट प्रदर्शित झाल्यास हिंदू समाजाच्या भावनांना सामोर जावे लागेल, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे. विजयनगर येथील ओरंम चित्रपट ग्राहक बजरंग दलाने आपल्या कार्यकर्त्यांसहित जाऊन तेथील व्यवस्थापकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली.

यावेळी विश्रामबाग पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले. सनदशीर मार्गाने बजरंग दलाने पठान चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. तसेच शुक्रवारी जर पठान प्रदर्शित झाला तर हिंदू समाज आक्रमक होईल, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.

पश्चिम बंगालमध्येही 'पठान' चित्रपटावरून वाद

चित्रपटाला यापूर्वीही अनेक राज्यात विरोध झाला आहे. या सगळ्यानंतर बंगालमध्येही चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.ई टाइम्सच्या वृत्तानुसार 'पठान' चित्रपट बंगालच्या चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे, त्यामुळे बंगाली चित्रपटांचे नुकसान होणार आहे.बंगाली चित्रपटांच्या निर्मात्यांनी याबाबत आपले मत मांडले आहे.

बंगाली चित्रपट निर्मात्यांच्या मते, आमच्या भाषेतील चांगली कमाई करणारे चित्रपट रखडले आहेत. हे वितरण मॉडेल योग्य नाही. एवढेच नाही तर चित्रपट निर्माते कौशिक गांगुली म्हणतात, गरज पडल्यास सरकारलाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागेल आणि आम्हाला किमान 50 टक्के शो दिले जावेत, अशी मागणी यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi: 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Pune News: आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला अन् बेशु्द्ध होऊन अडकला, पुण्यातील तरुणासोबत विपरितच घडलं!

Nashik Lok Sabha: महायुतीचं अखेर ठरलं! नाशिकमधून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब? आज होणार घोषणा!

Petrol Diesel Rate 1st May 2024: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या आजच्या किंमती

Cylinder Price: LPG सिलिंडर झाला स्वस्त, निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वाचा नवे दर...

SCROLL FOR NEXT