Pathaan Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Box Office Collection Day 22: 'पठान'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 'व्हॅलेंटाईन डे' छप्परफाड कामगिरी...

शाहरुख खानचा 'पठान' बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान कमाई करीत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहे.

Chetan Bodke

Pathaan Box Office Collection Day 22: शाहरुख खानचा 'पठान' बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान कमाई करीत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहे. चित्रपटाने दंगल आणि केजीएफ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडित काढत आपले स्थान पक्के करीत आहे. शाहरुखने या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर दमदार पुन:रागमन केले आहे.

हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५० कोटींहून अधिकची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २२ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ फेब्रुवारीला अर्थात व्हॅलेंटाईन डे ला ४.२० कोटींची कमाई केली होती. तर, मंगळवारी या चित्रपटाने ५.६० कोटींची कमाई केली होती.

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'पठान' चित्रपटाने बुधवारी ३.५० कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला होता. सोबतच चित्रपटाने आता भारतात ५०२. ३५ कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात चित्रपटाने ९७० कोटींची कमाई करीत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाने केजीएफ २ ला मागे सारत आपले स्थान पक्के केले आहे. हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लवकरच एस. एस. राजामौलींचा 'बाहुबली २' या चित्रपटाला मागे सारत 'पठान' आपली बाजी मारण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये ५१०.९९ कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला असून चित्रपट किती कमाई करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

SCROLL FOR NEXT