Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: ५ हजार गमावणाऱ्या शाहरुखने ५०० कोटी कसे कमावले? किंग खानचा VIDEO होतोय व्हायरल

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असताना, शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: शाहरुख खान स्टारर 'पठान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला होता. सुमारे २५० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटाबाबत चर्चा होत होती की, हा चित्रपट २०० कोटी सहज पार करेल. पण नेमकं असंच सध्या या चित्रपटाबाबत घडलं आहे.

या चित्रपटाला देशातूनच नाही तर परदेशातूनही भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असताना, शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याच्या आईने दिलेले ५००० रुपये हरवल्याबद्दल बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओत शाहरुख खान म्हणतो, 'आम्ही ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर चादर चढवत होतो. आईने मला सुरक्षित ठेवण्यासाठी पाच हजार रुपये दिले. ते पैसे माझ्याकडून हरवले होते. मी त्या ठिकाणी शोधायला गेलो तर तिथे एक फकीर बसला होता, त्याने मला विचारले की, तुझे काही हरवले का? तर मी म्हणालो, हो. तो फकिर म्हणाला, तुझे पाच हजार रुपये हरवले का?

शाहरुख खान पुढे म्हणतो, 'मला माहित नव्हतं की त्यांना कसं काय माहित. तो फकिर शाहरुखला म्हणतो, जो इकडे आलाय, रेटमधून रिकाम्या हाताने जाणार नाही, ५ हजार रुपये गमावले असले तरी ही तू ५०० कोटी कमावणार. शाहरुख खानचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माशाअल्लाह आणि जय श्री राम असे लिहून युजर्स शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

शाहरुख खानच्या 'पठान'मध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांसारखे स्टार्सही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून दोन दिवसांत चित्रपटाने जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

सोबतच शाहरुख राजकुमार हिरानीच्या 'डंकी' चित्रपटात दिसणार असून त्याच्यासोबत तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 22 डिसेंबर २०२३ला ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतकेच नाही तर शाहरुखकडे दिग्दर्शक एटली यांचा 'जवान' हा चित्रपटही आहे, जो या वर्षी 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

कोणतेही पुरावे सापडले नाही...; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाची निरीक्षणे काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT