Parineeti's marriage to Raghav Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Shared Marriage Decision: चहा नाश्ता आणि...; ‘त्या’ भेटीनंतर परिणीतीने घेतला राघव चड्ढासोबत लग्न करण्याचा निर्णय

Parineeti Talks About Marriage Decision With Raghav Chaddha: नुकतंच परिणीतीने फोटो शेअर करत तिने राघव चड्ढाला स्वतःसाठी कसे निवडले हे सांगितले.

Chetan Bodke

Parineeti's Talks About Marriage Decision: आपचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या जोडीचा गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील कपूरथला येथे साखरपुडा पडला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही जोडी कशी काय एकमेकांच्या प्रेमात पडली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडीच्या एंगेजमेंटचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. नुकतंच परिणीतीने फोटो शेअर करण्यासोबतच तिने राघव चड्ढाला स्वतःसाठी कसे निवडले हे देखील सांगितले.

परिणीती चोप्राने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्राला तिचा लाईफ पार्टनर खूपच मनोरंजक पद्धतीने मिळाला आहे. परिणीतीने सांगितले की, जेव्हा परिणीतीने राघव चड्ढासोबत डेटसाठी गेले होती, त्यावेळी हीच व्यक्ती आपल्यासाठी परफेक्ट आहे, असं म्हणत तिने राघव चड्ढासोबत लग्न करायचे निर्णय घेतला.

यासोबतच परिणीती चोप्राने त्यांच्या एंगेजमेंटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंंत परिणीतीची सर्व फॅमिली दिसत असून प्रियंका चोप्रानेही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्यांच्या साखरपुड्याला दोघांच्याही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, मित्र मंडळी, बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि राजकारणी यांनी हजेरी लावली होती.

याशिवाय परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'उंचाई'मध्ये मुख्य भूमिकेत होती. तर यासोबतच परिणीती चोप्रा लवकरच इम्तियाज अलीच्या 'चमकिला' या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट पंजाबी गायक अमर सिंह चमकिला यांच्यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT