Parineeti Chopra On Dating Rumors Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra On Dating Rumors: ‘मीडियाला आपली लिमीट कळायला हवी, पर्सनल गोष्टींवर बोलणं टाळावं...’ परिणीती संतापली

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. नुकतेच परिणीती लग्नाबद्दल होत असलेल्या चर्चांवरून मीडियावर संतापली.

Chetan Bodke

Parineeti Chopra On Dating Rumors: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या नात्याची गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अद्याप या जोडीने आपल्या नात्याचे स्वरूप जाहीर केले नसून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले. पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू सोबत आप खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करून या जोडप्याचे अभिनंदन केले. नुकतेच, आता परिणीती चोप्राने राघव चढ्ढा यांच्या डेटिंगवर होत असलेल्या चर्चांवर मौन सोडले.

परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा काही दिवसांपूर्वी मुंबईत डिनरसाठी एकत्र स्पॉट झाले. यानंतर परिणीती चोप्रा आणि राघवही विमानतळावर एकत्र दिसले. तेव्हापासून परिणीती राघवला डेट करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर होत आहेत. त्यांचे लग्नही होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होत्या.

नुकतेच परिणीतीने एका संकेतस्थळाला दिलेल्या वृत्तानुसार, ‘माध्यमांचा आधार घेत माझ्या खासगी जीवनाबाबत चर्चा होत आहे. कधी-कधी मर्यादा ओलांडून लोक पर्सनल गोष्टींबाबत चर्चा करतात. याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि अपमान करणं यामध्ये काही फरक आहे. एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला द्यावं लागत असेल तर मी देणार नाही.’ परिणीतीनं राघव चढ्ढा यांचे नाव घेतले नाही. पण परिणीती ही राघव यांच्याबद्दल बोलली, याचा अंदाज सध्या नेटकरी लावत आहेत.

नुकतेच जेव्हा परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा हे जेव्हा एकत्र स्पॉट झाले होते, त्यावेळी सोशल मीडियावर यांच्याबाबत बरीच चर्चा सुरू होती. दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

परिणीती चोप्रा इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क या हिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या समोर आली होती. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता परिणीतीचा नवा कोणता चित्रपट येणार यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT