Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'बागी 4', 'परम सुंदरी' की 'द बंगाल फाइल्स' कोणाचा शो हाऊसफुल? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

Param Sundari vs Baaghi 4 vs The Bengal Files Collection : 'बागी 4', 'परम सुंदरी' आणि 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉक्स ऑफिसवर 'बागी 4', 'परम सुंदरी' आणि 'द बंगाल फाइल्स' चित्रपट पाहायला मिळत आहेत.

'बागी 4' आणि 'परम सुंदरी' एकमेकांना तगडी टक्कर देत आहे.

'द बंगाल फाइल्स'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे.

टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'बागी 4' (Baaghi 4) आणि पल्लवी जोशीचा (Pallavi Joshi) 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files) दोन्ही चित्रपट 5 सप्टेंबरला रिलीज झाले आहेत. तर सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'परम सुंदरी' (Param Sundari) रोमँटिक - कॉमेडी ड्रामा 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या तिन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'बागी 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • पहिला दिवस - 12 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 9 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 10.25 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • एकूण - 35.50 कोटी रुपये

'द बंगाल फाइल्स' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

  • पहिला दिवस - 1.75 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 2.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 2.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 1.10 कोटी रुपये

  • एकूण - 7.85 कोटी रुपये

'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'परम सुंदरी' चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा गाठणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'परम सुंदरी' चित्रपटाने 11 दिवसांत 46.75 कोटी रुपयांच्या कमाई केली आहे. 'परम सुंदरी' 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त 4 कोटी रुपये दूर आहे. 'परम सुंदरी'ने रिलीजच्या 11व्या दिवशी 75 लाख रुपये कमावले.

'परम सुंदरी'

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते.

'बागी 4'

'बागी 4' ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. 'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे.

'द बंगाल फाइल्स'

'द बंगाल फाइल्स' चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री पल्लवी जोशीने केली आहे. तसेच विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शन केले आहे.'द बंगाल फाइल्स' चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनित इस्सर हे कलाकार पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

SCROLL FOR NEXT