Panchayat 5 saam tv
मनोरंजन बातम्या

Panchayat 5 : 'फुलेरा' गावातून आली मोठी बातमी; 'पंचायत सीजन ५' ची तारीख ठरली? कलाकारांपासून ते कथानकापर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Panchayat 5 OTT Release Update : 'पंचायत सीजन 5' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. कलाकारांपासून ते कथानकापर्यंत सर्वकाही जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पंचायत सीजन 5' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पंचायत सीजन 4' खूप लोकप्रिय ठरला.

'पंचायत सीजन 4' मध्ये निवडणूक आणि राजकारण पाहायला मिळाले.

'पंचायत' बेव सीरिजचे पहिले 4 सीझन दमदार गाजले. आता 'पंचायत'चा सीझन 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंबंधित मोठी माहिती समोर आली आहे. 'पंचायत' सीरिजला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. सीझन 4 सर्वात लोकप्रिय होता. या सीरिजला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चाहत्यांची 'पंचायत'चा सीझन 5 साठी उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षक नव्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'पंचायत 5' रिलीज अपडेट

'पंचायत सीझन 4' च्या रिलीजनंतर काही काळातच निर्मात्यांनी 'पंचायत 5' ची अधिकृत घोषणा केली. इतकेच नाही तर सीरिजचा फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत 5' सीरिज निर्माते जुलै, जून 2026 मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाऊ शकते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

'पंचायत 5' ची स्टार कास्ट

'पंचायत 5'मध्ये जितेंद्र कुमारसोबतच नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार, अशोक पाठक आणि पंकज झा हे कलाकार झळकणार आहेत. 'पंचायत 5' ची घोषणा जुलै 2025 मध्ये करण्यात आली. अमेझॉन प्राइमने 'पंचायत 5' चे पोस्टर एक्स वर एका पोस्टमध्ये रिलीज केले, ज्यामध्ये लिहिले होते, "फुलेरा वापस आने की तैयारी शुरू कर लीजिए..." 'पंचायत 5' लवकरच अमेझॉन प्राइमवर येत आहे."

'पंचायत 5' ची कहाणी

'पंचायत सीझन 4' ची कहाणी बनारकसची पत्नी क्रांती देवी यांनी फुलेरा प्रधान निवडणुकीत विजय मिळवून संपवली. यामुळे फुलेरामध्ये उपप्रमुखपदावरून एक नवीन वाद निर्माण झाला. 'पंचायत 5'ची कहाणी याच मुद्द्याभोवती फिरेल. या सीझनची सुरुवात राजकीय गोंधळाने होईल.'पंचायत 5'साठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

Iron Kadhai Benefits : लोखंडी कढईत जेवण बनवण्याचे 'हे' आहेत ५ फायदे, जाणून घ्या

Maharashtra Live News Update : धुळे मनपा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार, 26 जानेवारीला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT