Palash Muchhal saam tv
मनोरंजन बातम्या

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Palash Muchhal Hospitalized : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबईत आल्यावरही पलाश मुच्छलला रुग्णालयात दाखल केले गेले. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

मुंबईत आल्यावर पलाश मुच्छलला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लग्नात स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक आला.

सध्या सर्वत्र स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. रोज एक नवा खुलासा होत आहे. स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक आल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. स्मृती आणि पलाश तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते. स्मृतीच्या वडीलांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर काही वेळाने पलाशची तब्येत देखी बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर स्मृतीने लग्नाचे संबंधित सर्व फोटो, पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या.

अशात आता नवीन अपडेट समोर आली आहे की, पलाश मुच्छल स्मृती मानधनाला धोका देत आहे. सोशल मीडियावर पलाशसोबत एका महिलेचे फ्लर्टी चॅट्स तुफान व्हायरल होत आहेत. हे स्क्रीनशॉट खरे की खोटे याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच आता पलाश मुच्छलची तब्येत आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे. पलाशला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आधी पलाशला सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो घरी आणि मुंबईला रवाना झाला. पण मुंबईत आल्यावर त्याची तब्येत आणखी बिघडली आणि त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले.

मीडिया रिपोर्टनुसार, सांगलीला असताना पलाश मुच्छलला व्हायरल इन्फेक्शन आणि ॲसिडिटी झाली होती. पलाशचा इसीजी काढण्यात आला. त्याला काही तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आणि रुग्णालयातून सोडले. त्यानंतर मुंबईतील SRV हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले. तेव्हा पलाश मुच्छलची बहीण पलकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात पलक भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईला आल्यावर पुन्हा पलाशची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे.

अमिता मुच्छल यांनी सांगितल्यानुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय हा पलाशने घेतला. पलाशचे स्मृतीच्या वडीलांशी चांगले नाते आहे. आता स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न होणार की नाही? त्यांच्या नात्यांचे पुढे काय? असे प्रश्न स्मृती मानधनाच्या चाहत्यांना पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

Iran–Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे रायगडमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची धास्ती

SCROLL FOR NEXT