Palak Tiwari-Pooja Hegde Got Trolled Saam TV
मनोरंजन बातम्या

Palak-Pooja At Iftar Party: बाबा सिद्दकीच्या इफ्तार पार्टीला गेल्या अन् पूजा हेगडे, पलक तिवारी ट्रोल झाल्या. हे आहे कारण

Palak-Pooja At Baba Siddique Iftar Party: पूजा हेगडे, पलक तिवारी इफ्तार पार्टीत ट्रोल झाल्या .

Pooja Dange

Celebrities attend Baba Siddique's Iftar party: दरवर्षी रमजान महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा असते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत अनेक कलाकारांची मांदियाळी असते. यावर्षी अशीच बॉलिवूड सेलिब्रिटींची रेलचेल पाहायला मिळाली. रविवारी म्हणजे १६ एप्रिलला बाबा सिद्दीकी यांनी दर वर्षीप्रमाणे एक भव्य इफ्तार पार्टी दिली. या इफ्तार पार्टीमध्ये सलमान खानसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

या पार्टीमध्ये पापाराझी आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले ते किसी का भाई किसी की जानची अभिनेत्री पूजा हेगडे आणि पलक तिवारी यांनी. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत दोघीही बोल्ड लूकमध्ये दिसल्या. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या कपड्यांमध्ये धुमाकूळ घातला.

पलक तिवारीने सिल्वर रंगाचा लेहेंगा घातला होता. पलक तिवारीने लेहेंग्यात तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट केली. पलक तिवारीने पार्टीदरम्यान बाबा सिद्दीकीसोबत पोज देते. तिच्या या बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. तिचा लूक सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. मात्र, इफ्तार पार्टीत इतका रिव्हिलिंग ड्रेस घातल्याने तिला अनेकजण ट्रोल करत आहेत.

तर बाबा सिद्दीकी यांच्या या इफ्तार पार्टीमध्ये किसी का भाई किसी की जान चित्रपटामधील अभिनेत्री पूजा हेगडे देखील सहभागी झाली होती. तिने ब्लॅक रंगाची साडी घातली होती. तर ब्लॅकलेस ब्लाउजमध्ये फिगर फ्लॉन्ट करताना पूजा दिसली. न्यूड मेकअप, हेअर बन आणि मिनिमल ज्वेलरी यांसह तिने तिचा लूक पूर्ण केला होता.

परंतु पलक सारखाच पूजाचा आऊटफिट देखील रिव्हिलिंग होता. इफ्तार पार्टीत या दोघीही ट्रोल झाल्या .

बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला सलमान खान, सलीम खान, कपिल शर्मा, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राघव, एली, नरगिस फकरी, शिव ठाकरे, रितेश-जेनेलिया, गौहर खान असे बरेच सेलिब्रिटी हजर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT