Ayesha Omar-Shoaib Malik Relationship Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayesha Omar-Shoaib Malik: शोएब मालिकची गर्लफ्रेंड आयेशा ओमारचे स्पष्टीकरण, म्हणाली आमचं नातं...

शोएबसोबत आयेशाचे फोटोशूट शोएब आणि सानियाच्या वैवाहिक जीवनातील अडचणीचे मुख्य कारण मानले जाते.

Pooja Dange

Ayesha-Shoaib Relationship Update: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्या दोघांच्या घटस्फोटाची अनेक कारणे सुद्धा समोर आली होती. दरम्यान शोएबची कथित गर्लफ्रेंड आयेशा हिने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

एका मुलाखती दरम्यान 41 वर्षीय अभिनेत्रीने आयेशा हिने सांगितले की, शोएबसोबत तिचे फोटोशूट हे शोएब आणि सानियाच्या वैवाहिक जीवनातील अडचणीचे मुख्य कारण मानले जाते आहे. परंतु हे फोटोशूट 2021 मध्ये करण्यात आले होते. मीडियाने अलीकडेच त्याचा वापर करून वाद निर्माण केला आणि यामुळेच मी आणि शोएब रिलेशनशिपमध्ये आहोत असे अनेकांना वाटत आहे. (Actress)

आयशाच्या म्हणण्यानुसार, शोएबसोबतचे तिचे फोटोशूट हे प्रोफेशनल अफेअर होते पण काही लोकांनी ते रोमँटिक शूट मानले होते. आयशा म्हणाली की, विवाहित लोकांच्या वैवाहिक आयुष्याबाहेरील अफेअरचे ती कधीच समर्थन करणार नाही. याआधी आयशा म्हणाली होती की, मला शोएब आणि सानिया दोघांबद्दल आदर आहे आणि शोएब मलिकसोबत लग्न करण्यात तिला रस नाही. (Celebrity)

शोएबने 2010 मध्ये सानियासोबत लग्न केले. तेव्हापासून हे जोडपे दुबईत राहत आहे. 2018 मध्ये शोएब आणि सानियाला इझान नावाचा मुलगा झाला. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की शोएब आणि सानिया आता एकत्र नाहीत आणि ते त्यांच्या मुलाचे सह-पालक आहेत. तसेच ते दोघे 'द मिर्झा मलिक शो'मध्येही एकत्र काम करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

ChocoLava Cake Recipe: लहान मुलांसाठी बनवा टेस्टी चोको लावा केक, वाचा सोपी रेसिपी

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह ९ जण जखमी

दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; बड्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Oil in Belly Button: रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये लावा 'हे' खास तेल; फायदे वाचून तुम्हीही व्हाल चकित

SCROLL FOR NEXT