Sevak - The Confessions | A Vidly Original Web Series Instagram/@vidlytv
मनोरंजन बातम्या

संतापजनक! पाकड्यांनी पुन्हा डिवचले; Sevak - The Confessions वेबसिरीजमधून केला हिंदू संतांचा अपमान

Sevak - The Confessions | A Vidly Original Web Series: पाकिस्तानने एका वेबसिरीजमधून पुन्हा भारताला डिवचण्याचे काम केले असून या सिरीजमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला गेला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Pakistani Web Series: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध जगजाहीर आहेत. खेळ असो किंवा सिनेमे भारताविरुद्ध नेहमीच गरळ ओकण्याचे काम पाकिस्तान करत असतो. त्यामुळेच पाकिस्तामधील हिंदू समुदायाला मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जातो. सध्या पाकिस्तानने एका वेबसिरीजमधून पुन्हा भारताला डिवचण्याचे काम केले असून या सिरीजमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला गेला आहे. 'सेवक-द कन्फेशन' असे या सिरीजचे नाव असून सोशल मीडियावर या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (Sevak - The Confessions Web Series)

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, 'सेवक-द कन्फेशन' (Sevak The Confessions) ही पाकिस्तानची (Pakistan) वेबसिरीज प्रदर्शित झाली असून या सिरीजमधून हिंदूचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. या सिरीजची कथा १९८४ च्या दंगलीची आहे. ज्यामध्ये बाबरी मशिदी तसेच गुजरात दंगलीचा आशय संदर्भ दाखवण्यात आला आहे.

सोबतच यामध्ये दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश, जुनैद खान यांच्याही आयुष्याशी निगडीत कथा दाखवण्यात आल्या आहेत. या सिरीजच्या ट्रेलरमध्ये हिंदू संताना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या प्रकाराने भारतीय नागरिक चांगलेच संतापले असून ज्यामुळे सोशल मीडियावर या सिरीजला विरोध केला जात आहे. (Latest Marathi News)

पाहा ट्रेलर-

या सिरीजवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत असून 'ही वेबसिरीज म्हणजे कचरा' असल्याचे अनेकांनी म्हणले आहे. तर काही नेटकऱ्यांनी काहीच समजले नसल्याचे म्हणत या वेबसिरीजची (Web Series) खिल्ली उडवली आहे. सोबतच काही नेटकऱ्यांनी 'आधी निट अभिनय करायला शिका', असा सल्लाही दिला आहे. एका नेटकऱ्याने "दुसऱ्या देशांकडून भीक मागता आणि अशा भारतविरोधी सिरीज बनवायला कसा पैसा येतो", अशीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सिरीजमधील या आक्षेपार्ह सीनबद्दल दिग्दर्शकाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. या वादग्रस्त वेबसिरीजचे आठ एपिसोड प्रदर्शित झाले असून त्याचे लेखन साजी गुलने केले आहे तर दिग्दर्शन अंजुम शहजादने केले आहे.

Edited By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT