Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

सानिया मिर्झाला शोएबने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, घटस्फोटानंतर व्यक्त होणाऱ्या प्रेमावर प्रश्नचिन्ह

शोएब मलिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सानियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sania Mirza Birthday: सानिया मिर्झाचा आज 36 वा वाढदिवस आहे. भारतीय टेनिस स्टारने तिचा वाढदिवस तिच्या मित्र-मैत्रिणींसह साजरा केला. परंतु सेलेब्रेशनमध्ये पती शोएब मलिक कुठेही दिसत नव्हता. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना शोएब मलिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सानियाला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याने ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत त्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. शोएबच्या शुभेच्छांमध्ये कोणताही उत्साह आणि प्रेम दिसत यावेळी दिसत नव्हते.

शोएब मलिकने ट्विटरवर शुभेच्छा देत लिहिले होते की, 'सानिया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझे आयुष्य निरोही आणि आनंदी जावो ही सदिच्छा! या दिवसाचा पुरेपूर आनंद घे.... शोएब मलिकच्या या ट्विटला उत्तर देत एका यूजरने लिहिले की, 'या शुभेच्छा वाचल्यानंतर पतीने पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत असे वाटत नाही. पण तरीही अल्लाकडे प्रार्थना करतो की तुमच्याबद्दल पसरलेल्या बातम्या चुकीच्या असतील. (Sania Mirza)

प्रसिद्ध फिल्ममेकर फराह खान, गायिका अनन्या बिर्ला यांनी या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सानिया मिर्झा आणि फराह खान अनेक वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. 2017 मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये दोघी एकत्र दिसल्या होत्या. फराहने इंस्टाग्रामवर सानिया मिर्झाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हिडिओ शेअर केला आहे. फराहने ता व्हिडिओला "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय @mirzasaniar .. या वर्षी तुला फक्त आनंद आणि प्रेम मिळो." (Birthday)

भारतातील लोकप्रिय गायिका सनसनाटी अनन्या बिर्ला हिनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वाढदिवसाच्या पार्टीची झलक शेअर केली आहे. ही पार्टी दुबईत झाली. (Social Media)

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला इजहान मिर्झा मलिक नावाचा चार वर्षाचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT