Milind Gawali On Adhyatm Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paduka Darshan Sohala 2024: अध्यात्माशिवाय दुसरं काहीच नाही, 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी सांगितलं महत्व

Milind Gawali On Spirtuality: या सोहळ्याला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावून १८ संत-महंतांच्या पादुकांचे दर्शन घेत आहेत. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, मिलिंद गवळी यांनी पादुकांचे दर्शन घेतलं.

Priya More

Paduka Darshan Utsav 2024 in Vashi:

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'श्रीगुरू पादुका दर्शन' उत्सवाला (Shriguru Paduka Darshan Program) मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सोहळ्याला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावून १८ संत-महंतांच्या पादुकांचे दर्शन घेत आहेत. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी पादुकांचे दर्शन घेतलं. त्यानंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) आणि प्रसिद्ध अभिनेत्री सारिका नवाथे (Sarika Nawathe) यांनी पादुकांचे दर्शन घेतलं.

मिलिंद गवळी यांनी सांगितले की, 'आयुष्यामध्ये असा योग पहिल्यांदाच येतो. तो योग याठिकाणी आला आहे. १८ संतांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. मी अध्यात्मिक सिनेमे केले आहेत. पण आजचा अनुभव अगदी अगळावेगळा आणि सुखद आहे. याठिकाणी खूपच भक्तीमय वातावरण आहे. आपल्या भारताची संस्कृती या पाश्चात्य देशांनी मारली होती. ती परत येत आहे.' 'आज 'आई कुठे काय करते' या मालिकेचे शूटिंग नाही. त्यामुळे मला इथे येण्याचा योग मिळाला. शक्य होत असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊन दर्शन घ्या.', असं आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केले आहे.

'मुंबई शहरामध्ये लोकं मॉल्सला, सिनेमा थिएटरला जातात. त्यांनी इथे यावे आणि पादुकांचे दर्शन घ्यावे. आजचा योग चुकवला तर परत आयुष्यात हा योग येईल की नाही हे मला नाही सांगता येणार. अध्यात्माशिवाय दुसरं काहीच नाही. आपल्या माणसांच्या पलिकडची ही शक्ती आहे. ही सुपरनॅचरल पावर आहे. महाराष्ट्राला साधुसंताची भूमी म्हणतो ते उगाचच नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये ६८ लाख लोकं पृथ्वीवरून गायब झाली. त्या लोकांमध्ये आपण नव्हतो. यामागे कुठे तरी आपल्या आई-वडीलांचे, साधु-संताचे, सुपरनॅचरल पावरचे आशीर्वाद आहेत. आपण मनुष्य जन्माला का आलो आहोत याचे उत्तर आपल्याकडे नाही. जीवन आणि मरण शाश्वत आहे. त्याच्यामधला आयुष्याचा जो काळ आहे तो मला वाटतं या साधुसंताच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीने पार करावा.', असे मला वाटतं असल्याचे मत मिलिंद गवळी यांनी व्यक्त केले.

अभिनेत्री सारिका नवाथे यांनी सांगितले की, 'आजच्या तरुण पिढीला खरंच अध्यात्माची गोडी लावण्याची गरज आहे. त्यांच्या आजच्या या मॉर्डन अॅम्युनिटीसोबत ही लोकं राहतात. त्यांना अध्यात्माची जोड मिळाली तर आपला देश उत्तम तयार होईल. मी स्वत: खूप अध्यात्मिक आहे. याची कारणे अनेक असू शकतात. माझ्या घरामध्ये लहानपणापासूनच संघाचे वातावरण आहे. आम्ही समितीमध्ये जायचो. काही रिच्युअल्स आपण रोज करतो. रोज दारासमोर रांगोळी काढणे. आमच्या घरामध्ये लहानपणापासून रांगोळी काढतात. ती हाताला लागलेली सवयी आहे. मी जरी फ्लॅटमध्ये राहत असली तरी देखील दारात जाऊन छोटसं स्वस्तिक, ओम किंवा फूलाची रांगोळी काढते. हे रिच्युअल करता करता तुम्ही स्पिरिच्युअॅलिटीकडे जाता.'

'माझी ७ ची शिफ्ट असली आणि घरातून साडेपाच वाजता निघायचे असले तरी देखील देवासमोर दिवा लावून निघते. संध्याकाळी शुभम करोति म्हणायचे ही सवयी आहे. आपण करतो म्हणून आपली येणारी पिढी करेल. माझे आई-वडील करायचे, सासू-सासरे करायचे. त्यामुळे मी करते. माझं बघून बघून आज जरी माझी मुलं रोज नसतील करत तरी मला विश्वास आहे की ते हे करायला लागतील. त्यामुळे या रिच्युअल्स खूप महत्वाच्या आहेत.', असं मत सारिका नवाथे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: 'या' राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, पैशाची चणचण भासणारच नाही; वाचा तुमचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

SCROLL FOR NEXT