सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य घड्याळाच्या काट्याप्रमाणं धावतंय. त्यामुळं प्रत्येक जण मनःशांती आणि समाधानाचा मार्ग शोधत असतो. 'अध्यात्म' हा त्याकडे पोहोचण्याचा सोपा आणि सरळ मार्ग. प्रत्येकालाच प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देणं शक्य होत नाही. त्यामुळं 'सकाळ माध्यम समूहा'नं हा अध्यात्माचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी १८ संत-महात्म्यांच्या पादुका दर्शनाचा 'न भूतो न भविष्यति...' सोहळा आयोजित केला आहे. या अध्यात्मिक उपक्रमाला सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
पादुका दर्शन सोहळा कधी आणि कुठे?
'सकाळ माध्यम समूहा' तर्फे 'श्री फॅमिली गाईड' प्रोग्रॅमच्या माध्यमातून मंगळवारी, २६ मार्च आणि बुधवारी, २७ मार्च २०२४ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांना १८ संत-विभूतींच्या पादुकांचे दर्शन (Darshan) घेण्याची सुवर्णसंधी एकाच ठिकाणी मिळणार आहे.
दर्शनासाठी १८ संत-महात्म्यांच्या पादुका
या ऐतिहासिक उपक्रमात १८ संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा)
संत मुक्ताबाई (जळगाव)
संत नामदेव महाराज (घुमान)
संत जनाबाई (गंगाखेड)
संत नरहरी सोनार (पंढरपूर)
संत सेनामहाराज (पंढरपूर)
संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर)
श्री रामदास स्वामी (सज्जनगड)
संत वेणाबाई (मिरज)
श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य श्री एम)
श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
श्री साईबाबा (शिर्डी)
प. प. टेंबे स्वामी महाराज (माणगाव)
श्री गजानन महाराज (शेगांव)
परमसदगुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी)
श्री शंकर महाराज (धनकवडी)
श्री गुळवणी महाराज (पुणे)
श्री गुरू बालाजी तांबे (कार्ला)
सहभागी व्हा!
'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवा'त पद्मभूषण श्री एम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले ५००० भक्तांसमवेत अग्निहोत्र संपन्न करणार आहेत. शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा 'सूर-संध्या' हा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे. या दोन दिवसांत भाविकांना आध्यात्मिक पर्वणीचा लाभ आणि गुरू व संतांचे आशीर्वाद घेता येणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी https://srifamilyguide.com/event-page या पेजवर क्लिक करू शकता. भाविकांना प्रवेश विनामूल्य असून, नोंदणी करणे आवश्यक आहे.
पुण्यातून विशेष बससेवा
पादुका दर्शन उत्सवासाठी पुण्यातून (Pune) नवी मुंबईत येण्यासाठी 'पर्पल मेट्रोलिंक' ने कमी दरात एसी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातून ही बस वाशी प्लाझाजवळ येईल. तेथून तुम्हाला सिडको एक्झिबिशन सेंटर अगदी जवळ आहे. ही बससेवा २६ आणि २७ मार्च रोजी उपलब्ध असेल. पुण्यातून सकाळी सात वाजल्यापासून दर तासाला, नवी मुंबईतून पुण्यात येण्यासाठी रात्री आठपर्यंत बस सेवा मिळेल. बस सेवेसाठी येऊन-जाऊन ५०० रुपये इतके प्रतिव्यक्तीसाठी शुल्क असेल. पुण्यातून स्वारगेट (मित्रमंडळ चौक), कोथरूड (मोरे विद्यालयापासून), वाकड (शनी मंदिराजवळ, इंदिरा कॉलेज समोर) या ठिकाणांवरून बस सोडण्यात येतील. तर नवी मुंबईतून वाशी प्लाझावरून बससेवा उपलब्ध असेल. बस प्रवासासाठी पर्पल मेट्रोलिंक (कोथरूड ऑफिस) - ९११२४४७४७४, ०२०- २५४४२६४० यावर संपर्क साधू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.