Bollywood stars Saam Tv
मनोरंजन बातम्या

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात तल्लीन बॉलिवूड स्टार्स, 'या' स्टार्सनी केले ध्वजारोहण

आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य अमृतमहोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपले बॉलिवूड स्टार्सही मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य अमृतमहोत्सव(Independence Day) साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आज प्रत्येक भारतीयामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपले(Bollywood) बॉलिवूड स्टार्सही मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत आहेत. शाहरुख खान, सलमान खान, सारा अली खान, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अनुष्का शर्मा अशा अनेक कलाकारांनी देशाचा राष्ट्रीय ध्वज फडकवतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत आणि चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडचा दबंग सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हातात राष्ट्रध्वज घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. यादरम्यान, सलमान पांढर्‍या शर्ट आणि काळ्या पँटसह काळ्या टोपीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करताना सलमानने लिहिले की, "सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...जय हिंद."

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिरंगासोबत एक कोलाज फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सारा आई अमृता सिंगसोबत पोज देताना दिसत आहे. कोलाजमध्ये साराने तीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. पहिल्या फोटोत साराने भगवा रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दुसऱ्या फोटोत ती तिच्या आईसोबत पोज शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे तर शेवटच्या फोटोत, सारा हिरवा स्वेटशर्ट परिधान करून पर्वतांमध्‍ये पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली ७५वा स्वातंत्र्यदिन एकत्र साजरा करत आहेत. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केले आहे ज्यामध्ये ती पती विराटसोबत पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर मागे भारताचा तिरंगा फडकताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. अनुष्काने पोस्टमध्ये लिहिले की, 'आपण आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत जगभरातील सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा'.

अभिनेता कार्तिक आर्यनने लष्कराच्या जवानांसोबत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला, ज्याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त या अभिनेत्याने आपल्या भारतीय जवानांसोबत वेळ घालवला आहे.

अभिनेता अजय देवगणने 'भोला' चित्रपटाच्या क्रूसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याने 'भोला'च्या सेटवरून ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने आपल्या कुटुंबासह तिरंगा फडकावून स्वतंत्र दिन साजरा केला आहे. गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शुभेच्या दिल्या आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चननेही आपला झेंडा फडकवतानाचा फोटो शेअर करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा...'

बॉलिवूडचे अनेक कलाकार ७५ वा स्वतंत्र दिन साजरा करून त्यांच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या देऊन देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT